Nagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती

शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत गेलया दोन महिन्यांपासून ऑनलाइन व ऑफलाइन मुलाखती सुरू आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे चांगल्या पॅकेजचे ऑफर मिळत आहे. यात आयटी, कॉम्प्यूटर सायन्स आणि मॅकेनिकल शाखेतील विद्यार्थ्यांना चांगली मागणी आहे.

Nagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती
job

नागपूर : शहरातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सध्या कॅम्पास मुलाखती सुरू आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. विविध कंपन्यांद्वारे चांगले पॅकेजेच दिले जात आहेत. त्यामुळं अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस आले आहे. आय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना चांगली मागणी आहे.

75 टक्के विद्यार्थ्यांचे सिलेक्शन

शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत गेलया दोन महिन्यांपासून ऑनलाइन व ऑफलाइन मुलाखती सुरू आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे चांगल्या पॅकेजचे ऑफर मिळत आहे. यात आयटी, कॉम्प्यूटर सायन्स आणि मॅकेनिकल शाखेतील विद्यार्थ्यांना चांगली मागणी आहे. महाविद्यालयांमधील एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे 75 टक्के युवकांना कॅम्पसच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्यात. गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नव्हती. त्यामुळं या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला होता. तीन महाविद्यालयातील तीन हजारांवर विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांनी प्लेसमेंट देण्यात आलंय. सर्वाधिक वीस लाखांचे पॅकेज मिळालंय.

कमी गुण असणाऱ्यांना फटका

अन्य कॉलेजमध्ये सामान्य एनआरएफ रँकिंगसह अन्य कॉलेजमध्येही कंपन्यांकडून मुलाखती घेतली जात आहेत. परंतु, अशा कॉलेजमध्ये जास्त यश येताना दिसत नाही. चांगले गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. परंतु, कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा कॉलेजमध्ये कंपन्यांची संख्याही जास्त नाही. त्यामुळे पर्यायही कमी मिळत आहे.

कौशल्यावर आधारित प्रशिक्षण

कौशल्य विकासावर आधारित विविध प्रशिक्षण देण्यात आलं. या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्यात आले. कोरोनापूर्वीपेक्षा जास्त नोकऱ्या आयटी क्षेत्रात मिळू लागल्या आहेत. काही युवकांकडं आता दोन-तीन पर्याय उपलब्ध आहेत. तिन्ही कॉलेजमध्ये सर्वाधिक पॅकेज अमेझॉनकडून दिले जात आहे. वायसीसीईमध्ये 17 लाखांचे पॅकेज सर्वाधिक आहे. रायसोनीमध्येही अमेझॉनने 18 लाख पॅकेज देऊन प्रतिभावंत युवकांची निवड केली आहे. रामदेवबाबामध्ये अमेझॉनकडून 20 लाखांची ऑफर देण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी या पॅकेजमध्ये सिलेक्ट झाले आहे.

Nagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले

Nagpur Crime प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील परसोडीतील घटना

Published On - 1:15 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI