Nagpur | कोटोडी, पटकाखेडी व ऐरणगावातील जमिनींचे भुसंपादन; वेकोलिच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न केव्हा निकाली लागणार?

कोटोडी व ऐरणगावमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहेत. वेकोलिने याबाबत पर्यायी उपाययोजना करावी. यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या. भूसंपादन केलेल्या जमिनींचा मोबदला देण्यामध्ये वेकोलिला काही अडचणी असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय करावा.

Nagpur | कोटोडी, पटकाखेडी व ऐरणगावातील जमिनींचे भुसंपादन; वेकोलिच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न केव्हा निकाली लागणार?
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी घेतला आढावा. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 6:19 AM

नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) (Western Coalfield Limited) प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी तसेच भूसंपादनाच्या मोबदल्याच्या प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा, अशा सूचना पशुसंवर्धन (Minister for Animal Husbandry) व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. कोटोडी, पटकाखेडी व ऐरणगाव यथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे (Divisional Commissioner Dr. Madhavi Khode), जिल्हाधिकारी आर. विमला, सहाय्यक आयुक्त हरीश भामरे, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार, संचालक डॉ. संजय कुमार, सावनेरचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्यासह संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

गावनिहाय यादी तयार करण्याचे निर्देश

वेकोलिच्या खाणींसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या कोटोडी, पटकाखेडी व ऐरणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना उत्पन्नाचे दुसरे ठोस साधन नाही. त्यामुळं त्यांना जमिनीचा मोबदला, पात्र वारसांना नोकरी देण्याची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावीत. यासाठी वेकोलिकडे प्राप्त अर्जांमध्ये असलेल्या त्रुटींची त्वरित पूर्तता करून संबंधितांना लाभ द्यावा. ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांनी अद्याप मोबदला व नोकरीसाठी अर्ज केलेले नाहीत, त्यांची गावनिहाय यादी तयार करावी. त्यामध्ये अर्ज सादर न करण्याबाबतची कारणेही नमूद करावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव मोबदल्याबाबत आदेश पारित केलेल्या प्रकरणांमध्येही आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे केदार यावेळी म्हणाले.

पिण्याच्या पाण्याची समस्या

कोटोडी व ऐरणगावमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहेत. वेकोलिने याबाबत पर्यायी उपाययोजना करावी. यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या. भूसंपादन केलेल्या जमिनींचा मोबदला देण्यामध्ये वेकोलिला काही अडचणी असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय करावा. त्रुटींची पूर्तता करून घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपविभागीय अधिकारी श्री. म्हेत्रे, तहसीलदार श्री. वाघमारे यांनी उपरोक्त तिन्ही गावातील भूसंपादन मोबदल्याच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली.

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....