उत्तर प्रदेशप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी

सुनील ढगे

| Edited By: |

Updated on: Jul 11, 2021 | 5:13 PM

उत्तर प्रदेशाप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची आवश्यकता असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

उत्तर प्रदेशप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

नागपूर : उत्तर प्रदेशाप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची आवश्यकता असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते आज नागपुरात बोलत होते. उत्तर प्रदेशात आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची तयारी तेथील राज्य सरकारने केली आहे. या विषयावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या राज्यात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्या राज्यात हा कायदा आणणे आवश्यक आहे. सोबतच गरज पडल्यास देशातही हा कायदा आणणे आवश्यक आहे. (like Uttar Pradesh India should bring in a population control law; Devendra Fadnavis Demands)

फडणवीस म्हणाले की, गरज पडल्यास देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणे आवश्यक आहे, परंतु बळजबरी न करता हा कायदा आणावा. कारण लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे. नागपूरच्या प्रगतीत आपले महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच आपल्या कार्यकर्तुत्वाने नागपूरचे नाव देशभरात गजवणाऱ्या विविध व्यक्तिंच्या पुतळ्यांचे आणि शिलान्यासाचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मौलाना अब्दुल करीम पारेख, पद्मश्री डॉ. बी. एस. चौबे, लोकनायक बापूजी अणे, विदर्भवीर खा. जांबुवंतराव धोटे, ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य, स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्यां सुमतीताई सुकळीकर, महान कवी ग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन अशा 8 हिरोज ऑफ नागपूरचा यात समावेश आहे. हे सर्व पुतळे आणि शिलान्यास शहरातील मुख्य परिसरातील सिव्हिल लाइन्स येथे रस्त्याचा कडेला उभारण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांची नागपूर मनपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (10 जुलै) भाजपने नागपुरातील सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरसेवकांना निवडणुकीचा कानमंत्र दिला.

नागपूर मनपात गेल्या तीन टर्मपासून भाजपची सत्ता आहे, आगामी मनपा निवडणूक जिंकण्याचीही भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आली. दरम्यान, आम्ही नागपूर मनपा निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, असे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

इतर बातम्या

भास्कर जाधवांनी विधानसभाध्यक्ष व्हावे, पण निष्पक्ष काम करावे! देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला

राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर खोचक टीका

निवडणुका लागेपर्यंत केंद्राने ओबीसी समाजाचा इम्पेरीकल डेटा गोळा करावा; शिवसेनेची मागणी

(like Uttar Pradesh India should bring in a population control law; Devendra Fadnavis Demands)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI