Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे हजारापेक्षा जास्त रुग्ण; काय आहे आजची नेमकी स्थिती?

जिल्ह्यात बुधवारी एक हजार 461 नवे कोरोनाबाधित आढळले. चाचण्यांची संख्या साडेबारा हजारांहून अधिक आहे. एकूण साडेपाच हजारांहून जास्त सक्रिय रुग्ण आहेत.

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे हजारापेक्षा जास्त रुग्ण; काय आहे आजची नेमकी स्थिती?
पुणे शहरात 19 हजार 452 रुग्णसंख्या
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 9:06 AM

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये प्रचंड झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात जवळपास पावणेआठ महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येने हजारापलीकडे नोंद केली गेली. बुधवारला तब्बल एक हजार 461 नव्या बाधितांची भर पडली आहे. त्यामुळं प्रशासनाचीही (Administration) चिंता वाढली आहे. सातत्याने कोरोनाबाधित (Corona) वाढत असताना जनतेने जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. आजघडीला शहरात चार हजार 876, ग्रामीणमध्ये 775 व जिल्ह्याबाहेरील 37 असे तब्बल 5 हजार 688 वर सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी लक्षणे असलेले 37 जण एम्समध्ये 17 जण मेडिकलला, 4 रुग्ण मेयोत तर इतर रुग्ण हे शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. लक्षणे नसलेले गृह विलगीकरणामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

गेल्या आठ महिन्यांतील रुग्णसंख्येचा उच्चांक

यापूर्वी जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना दैनंदिन रुग्णसंख्या आठ हजाराच्या घरात पोहचली होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप ओसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतरही दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या घरात होती. जूननंतर यात मोठी घट झाली. जुलैमध्ये रुग्णसंख्या तीसच्या खाली आली. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वीसहून कमीच राहिली. यानंतर दररोज ही रुग्णसंख्या एक अंकीमध्ये नोंदविल्या गेली होती. यापूर्वी 15 मे 2021 रोजी म्हणजेच दुसरी लाट कायम असताना जिल्ह्यात 1 हजार 510 बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी जवळपास पावणेआठ महिन्यानंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्येने उच्चांकी गाठली आहे. बुधवारला तब्बल 1 हजार 461 बाधितांची भर पडली आहे.

11.48 टक्के जणांचे अहवाल सकारात्मक

बुधवारला शहरात नऊ हजार 223 ग्रामीणमध्ये तीन हजार 506 अशा जिल्ह्यात 12 हजार 729 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी 11.48 टक्के जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यात शहरातून तब्बल 1157, ग्रामीणमधून 236 व जिल्ह्याबाहेरील 68 नव्या बाधितांची भर पडली. दिवसभरात शहरातून 328, ग्रामीणमधून 102 व जिल्ह्याबाहेरील 67 असे 497 जण बरे होऊन घरी परतले आहे. तर दिवसाआड कोरोनामुक्तांचे प्रमाण घटून बाधितांची संख्या वाढल्याने रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही घटली आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.84 टक्क्यांवर पोहचले आहे. कधी काळी पन्नासहून कमी सक्रिय रुग्णसंख्या असलेल्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा झपाट्याने पाय पसरविण्यास सुरुवात केली. दैनंदिन बाधितांचे प्रमाण वाढून कोरोनामुक्तांची संख्या घटल्याने सक्रिय रुग्णसंख्येत प्रचंड मोठी वाढ झाली.

Engineering | नागपूरमध्ये अभियांत्रिकी प्रवेशात आयटी, कम्प्युटर फुल्ल; मेकॅनिकल, सिव्हिलमध्ये शुकशुकाट का?

Vidarbha Sahitya Sangh | आज शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाची अनोखी ओळख…!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.