AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी माझ्या मुलांना सांगतो, राजकारणात यायचं असेल तर…; नितीन गडकरींचा काय सल्ला?

BJP Leader Nitin Gadkari on His Son and Maharashtra Politics : नागपुरात बोलताना भाजप नेते नितीन गडकरी यांचा मुलांना काय सल्ला? राजकारणात यायचं असेल तर काय करावं? गडकरी काय म्हणाले? राजकारण आणि नागपुरातील विकासकामांवर गडकरी काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मी माझ्या मुलांना सांगतो, राजकारणात यायचं असेल तर...; नितीन गडकरींचा काय सल्ला?
| Updated on: Mar 24, 2024 | 8:40 AM
Share

गेल्या 10 वर्षात नागपूरात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. ही फक्त रील आहे खरा सिनेमा अजून बाकी आहे… मला चिंता नाही. माझ्या मुलाला राजकारणात आणयचं म्हणून… माझ्या मुलांना सांगितलंय की, माझ्या जीवावर राजकारणात यायचं नाही. राजकारणात यायचं असेल तर भींतीवर पोस्टर लावावं लागेल. शून्यातून उभं राहावं लागेल. लोकांमध्ये जावून काम करावं लागेल, असं मी माझ्या मुलांना सांगतो. माझ्या राजकीय कारकीर्दीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. लोकांनी मला उभं केलंय आणि लोकांसाठीच मी काम करतो, असं गडकरी म्हणाले.

“तेव्हा ते संभ्रम निर्माण करतात”

कोवीड काळात 100 कोटी रुपयांचं कोवीड साहित्य मी आंध्रप्रदेशमधून 47 हजार रुपयांत दिलं. जात – पात न बघता मी सगळ्यांना मदत केली. मी याआधीही ताजबागेत सांगितलंय की, वोट देणार त्यांच पण काम करणार जो नाही देणार त्याच पण काम करणार आहे. ज्यांनी आणीबानी आणली ते आमच्यावर संविधान तोडणार अशे आरोप करतात. लोकांना मनवू करू शकत नाहीत तेव्हा संभ्रम निर्माण करतात, असं नितीन गडकरी म्हणाले.

विरोधकही कौतुक करतात- गडकरी

एकेकाळी गाडी नव्हती. एकाला अध्यक्ष केल कारण त्याच्याकडे ॲबॅसिटर कार होती. आता एवढ्या गाड्या झाल्या की रस्ता बंद होतो. लाखो कार्यकर्त्यांच्या बलिदानामुळे आम्हाला आज हा दिवस पहायला मिळाले. अरुणाचलमध्ये नागपूरच्या नागरिकांकडून टॅक्सी वाल्यांनी पैसे घेतले नाहीत. कारण रस्ता नितीन गडकरींनी बनवला. लोकसभा अध्यक्षांनी मला फोन करून लोकसभेत बोलवलं. लोकसभेत विरोधी पक्षाच्या 75 खासदारांनी माझी प्रशंसा केली. सोनिया गांधी, राहुल गांधी, असदुद्दिन औवेसी या सर्वांनी माझे आभार मानले. मी त्यांच्या मतदारसंघात सुध्दा काम केलीत, असं गडकरी यावेळी म्हणाले.

नितीन गडकरी काय म्हणाले?

प्रत्येक बुथवर 75 टक्के मतदान झाल पाहिजे. कुठलीच निवडणूक मॅनेजमेंट मी करणार नाही. जेवायला असणार पण प्यायला नाही. शाहीस्ते खान 3 लाख सेना घेऊन आला पण शिवाजी महाराजांच्या 15 लोकांनी परत पाठवलं. मला काही कॉंग्रेसचे लोक भेटली माझं काम करतो, असं म्हणाले. मी म्हटलं काम करा मात्र तुमच राजकीय आय़ुष्य खराब करून घेऊ नका. 5 लाखांच्या मार्जीनने मी निवडून येणार, ही मला गॅरंटी आहे. बस, टॅक्सी काहीच मी देणार नाही. माझा फॉर्म भरायला किती लोक येतात. मला पाहायचं आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.

..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.