नागपुरात चिमुकल्यांचे न्युमोकॉकल लसीकरण, शेजारी मनपा अधिकाऱ्याचे मास्क खाली करुन फोटोसेशन

मात्र खुद्द आरोग्य यंत्रणांचेच अधिकारी या नियमाला तिलांजली देत असतील तर त्याला काय म्हणावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागपुरात चिमुकल्यांचे न्युमोकॉकल लसीकरण, शेजारी मनपा अधिकाऱ्याचे मास्क खाली करुन फोटोसेशन
नागपुरात चिमुकल्यांचे न्युमोकॉकल लसीकरण, शेजारी मनपा अधिकाऱ्याचा मास्क खाली करुन फोटोसेशन
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 3:17 PM

नागपूर : नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहीम प्रारंभ करण्यात आली. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारींनी या मोहिमेची सुरुवात केली. मात्र चिमुकल्यांना न्युमोकॉकल लस देताना शेजारी असलेले नागपूर महापालिकेचे अधिकारी विनामास्क चिमुकल्यांच्या शेजारी वावरत असल्याचे दिसले. नागपुरात न्युमोकॉकल लसीकरणाच्या वेळी हा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Nagpur Children Pneumococcal vaccination health officer remove the mask for photo session)

आरोग्य अधिकाऱ्यांकडून नियमाला तिलांजली 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मास्क. याबाबतची आरोग्य यंत्रणांकडून वारंवार सूचना केली जात आहे. मात्र खुद्द आरोग्य यंत्रणांचेच अधिकारी या नियमाला तिलांजली देत असतील तर त्याला काय म्हणावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागपुरात चिमुकल्यांचे न्युमोकॉकल लसीकरण, शेजारी मनपा अधिकाऱ्याचा मास्क खाली करुन फोटोसेशन

फोटोसाठी मास्क खाली 

नागपूरात आजपासून म्युमोकॉकल या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या लसीकरणावेळी खुद्द महापालिकेचे सहआयुक्त राम जोशी आणि आरोग्य अधिकारी यांनी मास्क खाली केला होता. या केंद्रांवर लहान मुलांचं लसीकरण सुरू होतं. शिवाय त्यांच्या माता आणि इतर कर्मचारी होते. ही मुलं अगदी दोन चार महिन्यांची असल्यानं त्यांना मास्क घालणं शक्य नाही.

अधिकाऱ्यांना ताकीद 

त्यामुळं त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांना मास्क घालणं अनिवार्यच होतं. मात्र, आरोग्य अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य कळलं नाही आणि त्यांनी आपला मास्क खाली केला होता. यासंदर्भात महापौरांना विचारल्यावर त्यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली. जर अधिकारी असं वागत असतील तर ही गंभीर चूक आहे, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद दिली जाईल, असं महापौरांनी सांगितलं.

संबंधित बातम्या : 

PCV vaccination | नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेला सुरुवात, पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद

नागपूर मनपा झोपडपट्टी भागात सुरु करणार इंग्रजी माध्यमाच्या शाळा, आकांक्षा फाऊंडेशनसोबत झाला सामंजस्य करार

माझ्या वक्तव्याचा विपर्यास, मनगढत कहाण्या रचून सरकारमध्ये फूट पाडण्याचा डाव; पटोलेंचा भाजपवर वार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.