PCV vaccination | नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेला सुरुवात, पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद

नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहीम प्रारंभ करण्यात आली आहे. फुटाळा आरोग्य केंद्रातून लहान मुलांचं लसीकरण सुरु झालं आहे. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारींनी मोहिमेची सुरुवात केली. या लसीकरणाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळतोय

PCV vaccination | नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेला सुरुवात, पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद
PCV Vaccination Nagpur

नागपूर : नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहीम प्रारंभ करण्यात आली आहे. फुटाळा आरोग्य केंद्रातून लहान मुलांचं लसीकरण सुरु झालं आहे. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारींनी मोहिमेची सुरुवात केली. या लसीकरणाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळतोय (PCV vaccination for pneumococcal disease for children started in Nagpur).

लहान मुलांमध्ये होणारा न्यूमोकॉकल आजार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी नागपुरात आजपासून बालकांच्या न्यूमोकॉकल लसीकरणाला सुरुवात झालीये. नागपूर मनपाच्या फुटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे लसीकरण सुरु झालंय. नागपूर मनपाद्वारे बालकांनाही लस नि:शुल्क देण्यात येतेय. कोरोनाच्या संकटात ही लस मुलांसाठी गरजेची आहे.

53 लसीकरण केंद्रावरुन लसीकरण

गंभीर न्युमोकॉकल आजार होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये दिसून येतो. या लसीमुळे गंभीर न्युमोकॉकल आजारापासून बाळाचे संरक्षण होणार आहे. ही लस नागपूर शहरातील एकूण 53 लसीकरण केंद्रावर आणि 987 बाह्य सत्रांमध्ये देण्यात येत आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीचा पहिला डोस दीड महिन्यात पहिला पेंटासोबत, दुसरा डोस साडेतीन महिने तिसऱ्या पेंटासोबत आणि तिसरा बुस्टर डोस 9 महिन्यात एम. आर. सोबत देण्यात येईल. अशी माहिती नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिलीये.

PCV लसीकरणाला नवी मुंबईत प्रारंभ

पाच वर्षांच्याआतील मुलांमधील न्युमोनियाचे स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया विषाणू हे प्रमुख कारण असून न्युमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आला आहे. शासन आदेशानुसार आजपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या मिनाताई ठाकरे रुग्णालय नेरुळ येथे शिवाजीनगर एमआयडीसी येथील अंश गजानन माडेकर हे 6 आठवड्याचे बाळ पीसीव्ही लसीचे पहिले लाभार्थी ठरले आहेत

न्युमोकोकल आजाराचा धोका एक वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये सर्वाधिक

न्युमोकोकल आजाराचा धोका एक वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये सर्वाधिक जाणवतो. तसेच 2 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये हा आजार गंभीर स्वरुपात आढळून येतो. या आजारामुळे लहान मुलांमध्ये होणारे धोके टाळण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात शासकीय आदेशानुसार न्युमोकोकल कन्ज्युगेट वॅक्सिनचा समावेश करण्यात आला असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 6 आठवडे पूर्ण झालेल्या बाळाच्या पालकांनी महानगरपालिकेच्या कोणत्याही रुग्णालय, नागरी आरोग्य केंदात विनामूल्य पीसीव्ही लसीचा डोस आपल्या बाळाला देऊन संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

PCV vaccination for pneumococcal disease for children started in Nagpur

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागपूर सज्ज, 2 लाख 14 हजार बालकांच्या मातांचे प्राधान्याने लसीकरण 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI