AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCV Vaccine | लहान मुलांसाठी न्युमोकोकल आजारापासून संरक्षण देणाऱ्या PCV लसीकरणाला नवी मुंबईत प्रारंभ

पाच वर्षांच्याआतील मुलांमधील न्युमोनियाचे स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया विषाणू हे प्रमुख कारण असून न्युमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आला आहे. शासन आदेशानुसार आजपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात करण्यात आलीये.

PCV Vaccine | लहान मुलांसाठी न्युमोकोकल आजारापासून संरक्षण देणाऱ्या PCV लसीकरणाला नवी मुंबईत प्रारंभ
PCV vaccination
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 11:33 AM
Share

नवी मुंबई : पाच वर्षांच्याआतील मुलांमधील न्युमोनियाचे स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया विषाणू हे प्रमुख कारण असून न्युमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आला आहे. शासन आदेशानुसार आजपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या मिनाताई ठाकरे रुग्णालय नेरुळ येथे शिवाजीनगर एमआयडीसी येथील अंश गजानन माडेकर हे 6 आठवड्याचे बाळ पीसीव्ही लसीचे पहिले लाभार्थी ठरले आहेत (PCV vaccination for pneumococcal disease started in Navi Mumbai).

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम नियमितपणे सुरु असून नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे दरमहा एकूण 118 स्थायी लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहेत. याशिवाय 324 बाह्य संपर्क सत्रे आणि 28 मोबाईल सत्रे आयोजित करण्यात येत आहेत. अशाप्रकारे दरमहा एकूण 470 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 0 ते 6 वयोगट दरम्यान विविध आजारांपासून बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी 7 टप्प्यात 12 आजारांना प्रतिबंध करण्याकरिता सार्वत्रिक लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जातो. यामध्ये आता न्युमोकोकल कंज्युगेट व्हॅक्सीनचा (PCV) समावेश करण्यात आलेला आहे.

जन्मानंतर सहा आठवड्याच्या म्हणजेच दीड महिन्याच्या बालकाला पीसीव्ही लसीचा पहिला डोस दिला जाणार असून 14 आठवडे म्हणजे साडेतीन महिन्याच्या बालकास दुसरा डोस तर नऊ महिन्याच्या बालकास बुस्टर डोस दिला जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेस पीसीव्ही लसीचे 1500 डोस प्राप्त झाले असून ही पीसीव्ही लस विनामूल्य देण्यात येणार आहे.

एकही बालक सार्वत्रिक लसीकरणापासून वंचीत राहू नये, महापालिका आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांप्रमाणेच अंगणवाडी, सोसायटी ऑफिसेस, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, दवाखाने, खाजगी रुग्णालये अशा विविध ठिकाणी बाह्य संपर्क सत्रे आयोजित करण्यात येत असून दगड खाणी, उड्डाणपुलाखालील वस्ती, स्टेशन लगतच्या वस्त्या, विटभट्ट्या, एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्टी भाग, बांधकाम साईट्स अशा ठिकाणी मोबाईल सत्रे आयोजित करण्यात येत असतात. एकही बालक विविध आजारांपासून संरक्षण करणाऱ्या सार्वत्रिक लसीकरणापासून वंचीत राहू नये असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिली आहे.

पीसीव्ही लस देण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी तसेच एएनएम यांचे रितसर प्रशिक्षण पूर्ण झाले असून आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांनाही प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. तसेच खागजी वैद्यकीय व्यावसायिक (General Practitioner) यांचीही कार्यशाळा आयोजित करुन त्यांना पीसीव्ही लसीकरणाबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

न्युमोकोकल आजाराचा धोका एक वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये सर्वाधिक

न्युमोकोकल आजाराचा धोका एक वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये सर्वाधिक जाणवतो. तसेच 2 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये हा आजार गंभीर स्वरुपात आढळून येतो. या आजारामुळे लहान मुलांमध्ये होणारे धोके टाळण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात शासकीय आदेशानुसार न्युमोकोकल कन्ज्युगेट वॅक्सिनचा समावेश करण्यात आला असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 6 आठवडे पूर्ण झालेल्या बाळाच्या पालकांनी महानगरपालिकेच्या कोणत्याही रुग्णालय, नागरी आरोग्य केंदात विनामूल्य पीसीव्ही लसीचा डोस आपल्या बाळाला देऊन संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

PCV vaccination for pneumococcal disease started in Navi Mumbai

संबंधित बातम्या :

ओळखपत्रधारक पत्रकार, लसीचे 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची मागणी

Navi Mumbai Corona | ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, APMC मार्केटमध्ये कोरोनाचा नियमांना हरताळ

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.