विदर्भात पुन्हा कोरोनाचा प्रकोप, नागपूरमध्येही रुग्ण वाढले, शेकडो खाटा राखीव, लॉकडाऊन अटळ

विदर्भात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप सुरु झाला आहे. आठवड्भरापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चालू आठवड्याच्या संख्येवरुन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळतायत.

विदर्भात पुन्हा कोरोनाचा प्रकोप, नागपूरमध्येही रुग्ण वाढले, शेकडो खाटा राखीव, लॉकडाऊन अटळ
Corona Virus
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 8:37 AM

नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप सुरु झाला आहे. आठवड्भरापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चालू आठवड्याच्या संख्येवरुन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळतायत. त्यामुळे नागपूरमध्ये पुढील तीन दिवसांत शासन प्रशासन पुन्हा एकदा निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. तशी माहिती नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिलीय.

विदर्भात पुन्हा कोरोनाचा प्रकोप, नागपूरमध्येही कोरोना रुग्ण वाढले

गेल्या तीन दिवसांपासून नागपूर जिल्हयात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तर विदर्भात गेल्या सहा दिवसांत 217 नवीन कोरोना रुग्णांची भर पडलीय. गेल्या तीन दिवसांपासून नागपूर जिल्हयात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. नागपूर जिल्हयात गेल्या तीन दिवसांत 30 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे विदर्भात कोरोना मृत्यूचं प्रमाण 1.90 टक्क्यांवर स्थिर आहे.

नागपुरात येत्या तीन दिवसात लॉकडाऊनचे अधिक कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. हे निर्बंध लावताना रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कमी करण्यात येणार आहे. तसेच विकेंडला संपूर्ण लॉकडाऊनही लावण्यात येणार असल्याचं सूतोवाच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी संख्येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या डबल अंकी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नियमांचं पालन करा

नेकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले होते, तरीही त्यांना कोरोना झाला. त्यामुळे बिनधास्त राहू नका. मास्क लावा आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे. तसेच आज 78 सँपल जिनम सिक्वेन्ससाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल काय येतो ते पाहू, असं सांगतानाच जेव्हा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडीवरून दोन आकडीवर जाते तेव्हा कोरोनाचा धोका वाढल्याचं समजून जायचं असतं. सध्या जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याने खबरदारी घेतली जात आहे, असं राऊत म्हणाले.

तिसरी लाट आली

आपण सारखं म्हणतो दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार. आता तिसऱ्या लाटेने आपल्या जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागणार आहेत. हे निर्बंध येत्या दोन तीन दिवसात लावण्यात येतील. निर्बंध लावण्यापूर्वी लोकांशी चर्चा करण्यात येईल. चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा करू. हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करू आणि मीडियाशीही चर्चा करून सर्वांची मते जाणून घेऊन नंतर निर्णय घेऊ. मात्र, येत्या तीन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

खाटा राखीव ठेवल्या

सध्या शहरामध्ये डेंग्यू रुग्णवाढ होत असून त्याचे विश्लेषण वैद्यकीय तज्ज्ञाकडून केले गेले. सध्या मेडिकलमध्ये दोनशे खाटा तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेवून कोविडसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची मुबलक व्यवस्था जिल्ह्यामध्ये आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरापर्यंत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची उपलब्धता करण्यात आली आहे.

आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार काळजी

तिसऱ्या लाटेत आयसीएमआरने ज्या उपयायोजना करायला सांगितल्या आहेत. त्यानुसार तरतुदी करण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी बेड तयार ठेवण्यात आल्या आहेत. दोन डोस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बिनधास्त राहू नका. मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा, गर्दी टाळा, दोन लसी घेतलेल्यांसह सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

(Nagpur Corona patient Increase Day by Day Lockdown restriction Soon Nagpur)

हे ही वाचा :

VIDEO: नागपुरात तीन दिवसानंतर लॉकडाऊन अटळ?, कसे असतील निर्बंध?; वाचा सविस्तर

VIDEO: नागपूर पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? नितीन राऊतांचं मोठं वक्तव्य, तिसऱ्या लाटेची भीती?