VIDEO: नागपूर पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? नितीन राऊतांचं मोठं वक्तव्य, तिसऱ्या लाटेची भीती?

सुनील ढगे

| Edited By: |

Updated on: Sep 06, 2021 | 7:04 PM

गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. (nitin raut hint to impose lockdown restrictions in nagpur within 3 days)

VIDEO: नागपूर पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? नितीन राऊतांचं मोठं वक्तव्य, तिसऱ्या लाटेची भीती?
nitin raut

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या तीन ते चार दिवसात नागपूरमध्ये लॉकडाऊन लावण्याचं सूतोवाच नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे नागपूरला पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये जावं लागणार असल्याचं दिसून येत आहे. (nitin raut hint to impose lockdown restrictions in nagpur within 3 days)

गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी संख्येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या डबल अंकी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी राऊत यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी आणि डॉक्टरांना सूचनाही केल्या. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधतान लॉकडाऊन लावण्याचे सूतोवाच केलं.

तिसरी लाट आली

आपण सारखं म्हणतो दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार. आता तिसऱ्या लाटेने आपल्या जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागणार आहेत. हे निर्बंध येत्या दोन तीन दिवसात लावण्यात येतील. निर्बंध लावण्यापूर्वी लोकांशी चर्चा करण्यात येईल. चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा करू. हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करू आणि मीडियाशीही चर्चा करून सर्वांची मते जाणून घेऊन नंतर निर्णय घेऊ. मात्र, येत्या तीन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

विकेंड लॉकडाऊनची शक्यता

राऊत यांनी यावेळी विकेंड लॉकडाऊन लावण्याची शक्यताही वर्तवली आहे. तसेच रेस्टॉरंट आणि दुकानाच्या वेळा कमी करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. मात्र, येणाऱ्या काळातील धोका लक्षात घेऊन निर्बंध लावण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

काही सँपल तपासणीसाठी पाठवले

काही सँपल आम्ही तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यात डेल्टा प्लस आहे का? हे अहवाल आल्यानंतर कळेल. मागच्या वेळी जे सगळं घडलं ते आता होऊ नये यासाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. ते कमी होत नाही. त्यामुळे निर्बंध लावण्यात येतील. ऑक्सिजन, बेड व्हेंटिलेटरची सुविधा आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (nitin raut hint to impose lockdown restrictions in nagpur within 3 days)

 

संबंधित बातम्या:

रात्रीची संचारबंदी करण्याचा निर्णय नाही; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणी 5 वर्षांचा कारावास, महाराष्ट्रातील कोर्टाचा सुपरफास्ट निकाल

आधी सोबतच्यांना शिकवा, मग आम्हाला सांगा, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

(nitin raut hint to impose lockdown restrictions in nagpur within 3 days)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI