रात्रीची संचारबंदी करण्याचा निर्णय नाही; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. (no night curfew in maharashtra says vijay wadettiwar)

रात्रीची संचारबंदी करण्याचा निर्णय नाही; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 5:39 PM

नागपूर: गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. नाईट कर्फ्यूचा निर्णय झालेला नाही. किंबहुना त्याची चर्चाच झाली नाही. तसेच रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. (no night curfew in maharashtra says vijay wadettiwar)

विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची नियमावली जाहीर करणार आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

समान मदत देण्यावर चर्चा

अतिवृष्टी आणि नुकसानीबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. प्रति हेक्टर मदतीबाबत चर्चा झाली. सर्व विभागात समान मदतीवर चर्चा करण्यात आली. ऊस उत्पादकांना जास्त मदत देण्यावरही चर्चा करण्यात आली. याबाबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना वाढीव मदत द्यायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोडण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं.

शेट्टींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

राजू शेट्टी आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. सध्यातरी जिरायतीसाठी 1370 आणि बागायतीसाठी 18 हजार रुपये हेक्टर मदत एनडीआरएफच्या निकषानुसार देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे सात लाख हेक्टरचं नुकसान झालं आहे. पंचनामे सुरू आहेत. पाऊस धो धो पडतोय. हा ग्लोबल वॅार्मिंगचा धोका तर नाही ना? असा सवाल त्यांनी केला.

एनडीआरएफचे निकष बदलण्याची गरज

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना किती मदत द्यायची यावर चर्चा झाली. 2019 मध्ये झालेल्या नुकसान पेक्षा कमी मदत आहे. एनडीआरएफचे निकष बदलविण्याची गरज आहे. परत एक बैठक घेऊन एनडीआरएफ च्या निकषांनुसार मदत दिली जाईल, असं ते म्हणाले.

पडळकरांना इशारा

दरम्यान,  वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना पडळकरांना इशारा दिला आहे. पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं वडेट्टीवार म्हणाले. (no night curfew in maharashtra says vijay wadettiwar)

संबंधित बातम्या:

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत शासननिर्णयाचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, आंदोलनाचं शस्त्र अद्याप ठेवलेलं नाही- शेट्टी

खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा, वडेट्टीवारांचं पडळकरांना आव्हान; 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा

बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या शेतकऱ्याचा ऐन पोळ्याच्या दिवशी बुडून मृ्त्यू, औरंगाबादच्या देवळी गावावर शोककळा

(no night curfew in maharashtra says vijay wadettiwar)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.