AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत शासननिर्णयाचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, आंदोलनाचं शस्त्र अद्याप ठेवलेलं नाही- शेट्टी

राजू शेट्टी यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महापुरात ज्या शेतकऱ्यांची पिकं बुडाली आहेत, त्याचं पिक कर्ज हे 2019 च्या शासननिर्णयाप्रमाणे माफ करावं अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली. त्याबाबत स्वत: शेट्टी यांनी माहिती दिली आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत शासननिर्णयाचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, आंदोलनाचं शस्त्र अद्याप ठेवलेलं नाही- शेट्टी
राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 5:07 PM
Share

मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आलेला महापूर आणि महारवाड्यात अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी पंचगंगा परिक्रमा काढण्यात आली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महापुरात ज्या शेतकऱ्यांची पिकं बुडाली आहेत, त्याचं पिक कर्ज हे 2019 च्या शासननिर्णयाप्रमाणे माफ करावं अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली. त्याबाबत स्वत: शेट्टी यांनी माहिती दिली आहे. (CM Uddhav Thackeray assures Raju Shetty to take a government decision to help flood-hit farmers)

मुख्यमंत्र्यांनी 2019 च्या धर्तीवर मदतीची घोषणा केली होती. पण अद्याप शासननिर्णय झालेला नाही. त्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करुन शासननिर्णय घेऊन असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचं सरकारनं सांगितलं होतं. आता शेतकरी अडचणीत असताना ते पैसे तातडीने द्यावे अशी आमची मागणी होती. सरकारनं ती घोषणा केली आहे. त्यापासून शासन दूर जाणार नाही. पण सरकारवर सध्या आर्थिक संकट असल्यामुळे जुळवाजुळव सुरु आहे. शेतकऱ्यांना नक्की मदत देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

आंदोलनाचं शस्त्र खाली ठेवलेलं नाही

चिखली, आंबेगावच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर लोक सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाही. कारण, 32 वर्षापूर्वी पुनर्वसनाच्या नावाखाली मिळालेली जागा अद्याप त्यांच्या नावावर झालेली नाही. म्हणून लोक आपली जागा द्यायला तयार नाहीत. त्यामुळे सरकारनं दफ्तर दिरंगाईचे प्रकार टाळले पाहिजेत. लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे, असा सल्लाही शेट्टी यांनी यावेळी दिलाय. त्याचबरोबर आंदोलन मागे घेणार असा शब्द आपण मुख्यमंत्र्यांना दिला नाही. आंदोलनाचं शस्त्र खाली ठेवलेलं नाही. पण चर्चेचा मार्गही आम्ही खुला ठेवल्याचं शेट्टी यांनी यावेळी सांगितलं.

पूरग्रस्तांचं विनाअट पुनर्वसन करा

पूरग्रस्तांचं विनाअट पुनर्वसन करावं. चिखली हे सर्वाधिक पूरग्रस्त गाव आहे. या गावातील ग्रामस्थ माझ्यासोबत आले आहेत. या चिखलीतील नागरिकांना 1989 रोजी गावाचं स्थलांतर करायचं म्हणून भूखंड दिले होते. या भूखंडाचे प्रॉपर्टी कार्ड सरकारच्या नावावर आहे. पण गेल्या 32 वर्षात ही जागा गावकऱ्यांच्या नावावर करण्यात आलेली नाही. पुनर्सनाचे वाईट अनुभव आहेत. त्यामुळे सरकारने आयएस दर्जाचा अधिकारी नेमून प्रश्न निकाली लावावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

नवीन धरण बांधा

दरवर्षी पूर येत आहे. अर्थात वैश्विक तापमान वाढतं आहे. पण त्यात आमचा दोष नाही. मात्र, सरकारने धोरण ठरवावं. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशाने पाणी अडवण्याबाबत निर्णय घ्यावा. नवीन धरण बांधा आणि पाणी वळवा. केंद्रीय जल आयोगाने सर्वेक्षण केलं पाहिजे. पाणी वाटपाचा मुद्दा त्यात आहे. कोल्हापूरला पुराचा त्रास होतो. कोल्हापुरात 56 पूल, सांगलीतील 48 पूल आणि कर्नाटकमधील पूल असे 120 पूल पुराला कारणीभूत आहेत. या पुलांचा प्रश्न निकाली काढला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, बेळगावच्या भाजपच्या विजयावर राऊतांचा संताप

गणेशोत्सवानिमित्त भक्तांमध्ये मोठा उत्साह, नवी मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या

CM Uddhav Thackeray assures Raju Shetty to take a government decision to help flood-hit farmers

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.