गणेशोत्सवानिमित्त भक्तांमध्ये मोठा उत्साह, नवी मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या

कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरली असली तरी तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गणपती उत्सवानंतर ही लाट येण्याचा अंदाज असल्याचं बाजारात गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, काळजी घेऊन साधेपणाने सण साजरा करण्याचं आवाहन सरकारकडूनही करण्यात आलं आहे.

गणेशोत्सवानिमित्त भक्तांमध्ये मोठा उत्साह, नवी मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई मार्केटमध्ये भाविकांची गर्दी


नवी मुंबई : अवघ्या एका आठवड्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत भक्तांची लगबग सुरु झाली आहे. कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरली असली तरी तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गणपती उत्सवानंतर ही लाट येण्याचा अंदाज असल्याचं बाजारात गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, काळजी घेऊन साधेपणाने सण साजरा करण्याचं आवाहन सरकारकडूनही करण्यात आलं आहे. (Crowds in Vashi market on backdrop of Ganeshotsav, trend towards buying ecofriendly materials)

बाप्पाच्या आरतीसाठी लागणारे कापूर आणि धुप यांची खरेदी सुरु झाली आहे. मागील वर्षी अचानक वाढलेले कापूर आणि धुप यांचे दर यंदा स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवात बापाच्या पूजेच्या साहित्याला अधिक मागणी असते. पूजेच्या अन्य साहित्यासोबतच रोजच्या आरतीसाठी कापूर, धुप लागत असतो. मात्र, मागील वर्षीपासून कापूर दरात वाढ झाली आहे. आधी 400 ते 500 रुपये प्रतिकिलो मिळणारा कापूर मागील वर्षी 1 हजार ते 1 हजार 200 रुपयांवर पोहोचला होता. मात्र, यंदा कापूर दरात कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही. यंदा कापूर 1 हजार ते बाराशे किलो, तर धुप 600 रुपये किलोनं विकला जातोय.

पूजेचे सामान, सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी

राज्यातील एक मोठा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिलं जातं. त्यामुळे गणेशोत्सव आल्यावर गणेशमूर्तीपासून, मखर, हार, फुले यांची किंमतही वाढलेली असते. तरीही मोठ्या श्रद्धेने गणेशभक्त हा सण साजरा करत असतात. यंदाही तोच उत्साह भक्तांमध्ये दिसून येत आहे. मखर, सजावटीचे साहित्य, पूजेचे सामान खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी केली आहे. तर काही वस्तूंचे दर स्थिरावल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.

पर्यावरणपूरक सजावटीकडे भक्तांचा कल

वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात गणेशोत्सवानिमित्ताने गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी पूजा व सजावटीच्या पर्यावरणपूरक साहित्य खरेदीकरिता भाविकांची लगबग सुरू आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा बाजारपेठेत चैतन्य दिसत आहे. एपीएमसी घाऊक बाजारात मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील ग्राहकही सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात. यंदा लोकांचा पर्यावरणपूरक सजावटीकडे जास्त कल दिसत आहे. विविध प्रकारचे पर्यावरण पूरक मखर बाजारात उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी कापडी फुलांची माळ, धुप, कापूर, जानवे, सुगंधी अगरबत्ती, बाशिंग, विविध प्रकारचे मुकुट, सुगंधी अत्तर, मध इत्यादी साहित्य खरेदीकरिता ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

इतर बातम्या :

साई दरबारी पदभार घेतल्याचा आनंद, शिर्डी संस्थानच्या CEO भाग्यश्री बानाईत-धिवरेंची पहिली प्रतिक्रिया

Weight Loss : वजन कमी करायचे असेल तर ‘या’ डाएट टिप्स फॉलो करा, पोट काही दिवसात आत जाईल!

Crowds in Vashi market on backdrop of Ganeshotsav, trend towards buying ecofriendly materials

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI