साई दरबारी पदभार घेतल्याचा आनंद, शिर्डी संस्थानच्या CEO भाग्यश्री बानाईत-धिवरेंची पहिली प्रतिक्रिया

कान्हूराज बगाटे यांच्या जागी रेशीम उद्योग विभागाच्या संचालकपदी असलेल्या भाग्यश्री बानाईत-धिवरे यांची चारच दिवसांपूर्वी शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

साई दरबारी पदभार घेतल्याचा आनंद, शिर्डी संस्थानच्या CEO भाग्यश्री बानाईत-धिवरेंची पहिली प्रतिक्रिया
IAS Officer Bhagyashree Banayat Dhiware
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 3:32 PM

अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भाग्यश्री बानाईत-धिवरे (Bhagyashree Banayat) यांनी पदभार स्वीकारला. शासनाच्या आदेशानुसार पदभार घेऊन बानाईत यांनी कामाला सुरुवात केली. साई दरबारी पदभार घेतल्याचा आनंद असल्याची भावना यावेळी भाग्यश्री बानाईत-धिवरे यांनी व्यक्त केली. कान्हूराज बगाटे यांच्या जागी  रेशीम उद्योग विभागाच्या संचालकपदी असलेल्या बानाईत यांची चारच दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती.

काय म्हणाल्या भाग्यश्री बानाईत-धिवरे?

“लवकरच पूर्ण कामकाजाची माहिती करुन घेणार. साई भक्तांच्या सोयीसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यावर भर देणार आहे. साई मंदिर सुरु झाल्यावर भक्तांसाठी योग्य नियोजन करणार” अशी ग्वाही भाग्यश्री बानाईत-धिवरे यांनी दिली. “कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही या दृष्टीने सुविधा देणार. श्रद्धेने येणाऱ्या भाविकांच्या अडचणी दूर करणार, साई दरबारी पदभार घेतल्याचा आनंद आहे” अशी पहिली प्रतिक्रिया शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या साईओ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भाग्यश्री बानाईत यांनी दिली.

कोण आहेत भाग्यश्री बानाईत-धिवरे?

भाग्यश्री बानाईत यांचे शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. मोर्शी येथील कॉलेजमधून त्यांनी बीएस्सी पदवी घेतली. आई-वडील दोघंही शिक्षक असल्याने घरी शैक्षणिक वातावरण होतं. त्यामुळे बीएस्सीनंतर त्या बीएड झाल्या. त्यानंतर एक वर्ष त्यांनी एमएससी केलं.

एमपीएससी परीक्षेत सलग निवड होत 2005 मध्ये प्रकल्प अधिकारी, 2006 मध्ये तहसीलदार, तर 2007 मध्ये विक्रीकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पद त्यांना मिळाले. पण या निवडींवर समाधान मानलं नाही.

अखेर 2012 मध्ये त्या भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडल्या गेल्या. त्यावर्षी निवड झालेल्या भाग्यश्री बानाईत-धिवरे या महाराष्ट्र राज्यातील एकमेव महिला अधिकारी ठरल्या होत्या.

बगाटेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कान्हूराज बगाटे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. कान्हूराज बगाटे यांची 10 ऑगस्ट 2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली होती. त्यांना सरकारने पदोन्नतीतून आएएस पद दिलं होतं. ते थेट आयएएस अधिकारी नसल्याने त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले होते. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल करत बगाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या याचिकेत पोलीस प्रशासनाला उच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. कान्हूराज बगाटे यांच्या जागी आता भाग्यश्री बानाईत यांची नेमणूक करण्यात आली आहे, बगाटे मात्र अद्यापही नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

संबंधित बातम्या :

शिर्डी साईबाबा संस्थानच्या CEO पदी भाग्यश्री बानाईत-धिवरे, बगाटेंच्या जागी नियुक्ती

शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक नियमबाह्य, उच्च न्यायालयानं फटकारलं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.