Delta Plus Update: नागपूरवर डेल्टा प्लसचं संकट? एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना, प्रशासन ॲलर्ट

महाराष्ट्रावरील कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटचं संकट वाढताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यात एकाच कुंटुंबातील दहा जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं जिल्हा प्रशासन अ‌ॅलर्ट झालं आहे.

Delta Plus Update: नागपूरवर डेल्टा प्लसचं संकट? एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना, प्रशासन ॲलर्ट
delta plus
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 1:24 PM

नागपूर: महाराष्ट्रावरील कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटचं संकट वाढताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यात एकाच कुंटुंबातील दहा जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं जिल्हा प्रशासन अ‌ॅलर्ट झालं आहे. नागपूरातील डेल्टा प्लसच्या संशयित म्हणून त्या दहा रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी निरीनं हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. आता या अहवालामध्ये काय होतंय, याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे. (Nagpur Corona Update 10 people corona positive from one family sample sent Hyderabad for checking of Delta Plus Variant)

संशयित रुग्ण उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये

डेल्टा प्लसचे 10 संशयित रुग्ण उमरेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. हैदराबाद येथील प्रयोगशाळेकडून अहवाल पॅाझिटीव्ह आल्यास मेडीकल, मेयो मध्ये उपचारासांठी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमरेडच्या एकाच घरातील 10 जणांना झपाट्यानं कोरोनाची लागण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. निरीने नमुने हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

रत्नागिरीतीतून 117 नमुने तपासणीसाठी दिल्लीच्या प्रयोगशाळेत

रत्नागिरी जिल्ह्यातून दिल्लीच्या प्रयोगशाळेत डेल्टा प्लसच्या तपासणीसाठी 117 नमुने पाठवण्यात आले आहेत. 117 स्बॅब दिल्लीच्या प्रयोग शाळेत पोहोचले आहेत, जिल्हा प्रशासनाला अहवालाची प्रतीक्षा आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या रत्नागिरीमध्ये यापूर्वी 9 जणांना कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटचा संसर्ग झाला होता. डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण पाडललेल्या रत्नागिरीत आरोग्य यंत्रणा अ‌ॅलर्ट झाली आहे.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, या गोष्टी केल्यास आपण डेल्टा प्लसपासून बचाव करु शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

संबंधित बातम्या:

रत्नागिरीतील डेल्टा प्लस वेरिएंटचं संकट कायम, 117 नमुने तपासणीसाठी दिल्लीला रवाना, अहवालांची प्रतीक्षा

लोकांना जराही धीर नाही, कोरोनाकाळात राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी विचार करायला हवा- हायकोर्ट

(Nagpur Corona Update 10 people corona positive from one family sample sent Hyderabad for checking of Delta Plus Variant)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.