नागपूर जिल्ह्यात दीड वर्षानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्ण शून्यावर, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल

कोरोनाची लाट उसळल्यानंतर नागपुर शहरात पहिल्यांदा काल कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं सुरु आहे, असं म्हणता येईल.

नागपूर जिल्ह्यात दीड वर्षानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्ण शून्यावर, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल
NAGPUR MUNICIPAL CORPORATION

नागपूर : कोरोनाची लाट उसळल्यानंतर नागपूर शहरात पहिल्यांदा काल कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं सुरु आहे. परंतु नागरिकांनी यामुळे हुरळून न जाता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं

नागपुरात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेत तसेच दुसऱ्या लाटेत नागपूर शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. 6 आँगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत झालेल्या कोरोनाच्या चाचणीत एकही रुग्ण आढळून आला नाही. नागपूर शहरात 4 हजार 856 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. तसेच एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

नवीन रुग्णही नाही, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

नागपुर जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 92 हजार 925 कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 10 हजार 117 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. परंतु आज मात्र एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

नागपूर प्रशासनाची मेहनत फळाला

नागपुर शहरात आज एकही कोरोना रुग्ण प़ॉझीटिव्ह आढळला नाही, ही नागपूरसाठी चांगली बातमी आहे. यासाठी डॉक्टर व आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी चांगले काम केले आहे. त्याप्रमाणे महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे.

नागपूरकरांनो हुरळून जाऊ नका, पालकमंत्री राऊतांचं आवाहन

परंतु कोरोनाचे संकट टळलेले नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क व सुरक्षित राखण्याची आवश्यकता आहे. येणारा काळ हा सणासुदीचा आहे. त्यामुळे प्रार्थना स्थळांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळली पाहिजे, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

नागपूर ग्रामीण भागात आज केवळ एक कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागात सुद्धा पॉझिटिव्ह आढळू नये, यासाठी आरोग्य विभागाला निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागात आज 525 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात केवळ एक रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आढळून आला आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी: एकनाथ खडसे आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात, प्रकृती स्थिर

काँग्रेस आमदारांच्या स्विमिंग पूलमध्ये डुबक्या, धोतरं छत्रीवर वाळत, TV पाहून सोनियांचा विलासरावांना फोन, वाचा काय आहे किस्सा…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI