अशा मुर्खांना मी…; देवेंद्र फडणवीसांचा एका वाक्यात संजय राऊतांवर प्रहार

Devendra Fadnavis On Sanjay Raut Statement about Ram Mandir : मी मुर्खांना उत्तर देत नाही; देवेंद्र फडणवीसांचा एका वाक्यात संजय राऊतांवर प्रहार. संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांनी काय उत्तर दिलं? ट्विट केलेल्या त्या फोटोबाबत फडणवीस काय म्हणाले? वाचा सविस्तर...

अशा मुर्खांना मी...; देवेंद्र फडणवीसांचा एका वाक्यात संजय राऊतांवर प्रहार
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 2:47 PM

सुनील ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नागपूर | 21 जानेवारी 2024 : आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला. कारसेवक अयोध्येला जात असतानाचा हा फोटो नागपूर स्टेशनवरचा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे. मी मुर्खांना उत्तर देत नाही. त्यामुळे त्यांना कुठलंही उत्तर नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

आज सकाळी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आम्ही तुम्हाला काय पुरावे द्यायचे? तुमचे लोक तिथून पळून गेले. पण आमचे लोक बाबरी मशीदीच्या परिसरात होते. बाळासाहेब ठाकरेंनी या घटनेची जबाबदारी स्विकारली. तुमचा फोटो हा नागपूरच्या स्टेशनवरचा फोटो आहे. आमच्याकडे घुमटावरचे फोटो, व्हीडिओ आहेत. तुम्ही नागपूर स्टेशनवर फिरायला गेला असाल, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली होती.

देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट जसंच्या तसं

जुनी आठवण…

नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.

छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे…

नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.

मला नवभारत प्रकाशित होतं. या वृत्तपत्रातून त्यावेळेचा अंक पाठवला. एका फोटोग्राफर हा फोटो काढला होता. तो त्यांनी पाठवला त्यांचे आभार मानत मीट ट्विट केलं आहे.त्यावेळची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची आठवण पुन्हा मला झाली. त्या आनंदात मी ट्विट केलं आहे. उत्तर देण्याच्या भानगडीतही मी पाडायचं नसतं. हे तेच लोक आहे. ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व नाकारलेला आहे. ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते, असा प्रश्न विचारला मनाला तयार नाही. त्यांना मी उत्तर देत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी माझ्या आनंदा करता तो फोटो ट्विट केला आहे. संपूर्ण देश हा राममय झाला आहे. मी राम भक्त आहे. मी कारसेवक आहे. मी सुद्धा राममय आहे. मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कारसेवेला जाणार आहे. कारसेवा झालेली आहे. आता रामसेवेला फेब्रुवारीमध्ये आम्ही निश्चितपणे सगळेच जाणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Non Stop LIVE Update
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.