Dhamma Chakra Pravartan Din: यंदाही धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही, नागपूर जिल्हा प्रशासनाची माहिती

नागपूरच्या दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा यंदा देखील होणार नाही. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. नागपूर जिल्हा प्रशासनानं याविषयी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.

Dhamma Chakra Pravartan Din: यंदाही धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही, नागपूर जिल्हा प्रशासनाची माहिती
नागपूर दीक्षा भूमी


नागपूर: नागपूरच्या दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा यंदा देखील होणार नाही. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. नागपूर जिल्हा प्रशासनानं याविषयी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमीच्या दिवशी बुध्द धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी हजेरी लावतात.

साध्या पद्धतींनं सोहळ्याचं आयोजन

नागपूर च्या दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा  साध्या पद्धतीने होणार आहे. अनुयायांना या ठिकाणी येऊन नतमस्तक होता येणार नाही. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसर्‍याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नाही. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. नागपूरच्या   दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तेव्हा पासून दसऱ्याच्या दिवशी  हा मोठा सोहळा होत असतो लाखो अनुयायी या सोहळ्याला हजेरी  लावतात.

निर्णय का घेण्यात आला?

राज्य शासनाने धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येण्याच्या कार्यक्रमांना प्रतिबंधित केले आहे. नागपूर दीक्षाभूमी येथे 15 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या अनुयायांची संख्या लाखोमध्ये राहणार असून या ठिकाणी राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे कोविड- 19 चा प्रोटोकॉल पाळणे शक्य नसल्याचे सर्व संस्था व विभागाचे मत आहे. त्यामुळे यावर्षी अभिवादन सोहळा होऊ शकणार नाही, असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

चर्चा करुन निर्णय

जिल्हा प्रशासनाने नागपूर दीक्षाभूमीवर आयोजन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी अध्यक्षांशी 30 सप्टेंबरला बैठक घेतली. राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याबाबतची सूचना केली. तसेच नागपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व अन्य प्रमुख विभागाशीही या संदर्भात चर्चा केली होती. सर्वांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रेक द चैन अंतर्गत निर्णय

नागपूर येथे दीक्षाभूमीवर यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन होणार नाही. शासनाच्या ब्रेक द चेन 4 (XV ) निर्देशातंर्गत नागपूर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळं दरवर्षी दसर्‍याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नाही.

पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार

कोरोना विषाणू संसर्गामुळं सलग दुसऱ्या दिवशी दीक्षा भूमीवर होणारा धम्मचक्र पवर्तन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. दसऱ्याच्या दिवशी होणारा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा होणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला राज्यभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजेरी लावतात. धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

इतर बातम्या

खा. कोल्हे म्हणाले, अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय, फडणवीस म्हणाले, ‘स्वप्न बघायला…’

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा सेना खासदाराला विसर, म्हणाले, ‘मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण साहेब!’

Nagpur District Administration decided Dhamma Chakra Pravartan Din will not celebrated with large gatherings this year

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI