Nagpur | महादेवाचा नंदी दूध आणि पाणी पितो? नागपुरात पसरली अफवा, सिद्ध करणाऱ्यास ‘अंनिस’कडून 25 लाखांचे बक्षीस

नागपुरात एक वेगळीच अफवा पसरली आहे. महादेवाचा नंदी दूध आणि पाणी पित असल्याची अफवा नागपुरात वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी त्यावर विश्वासही ठेवायला सुरुवात केली. जो कुणी नंदी दूध आणि पाणी पितो, हे सिद्ध करुन दाखवल, त्याला 25 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी केली आहे.

Nagpur | महादेवाचा नंदी दूध आणि पाणी पितो? नागपुरात पसरली अफवा, सिद्ध करणाऱ्यास अंनिसकडून 25 लाखांचे बक्षीस
महादेवाचा नंदी दूध आणि पाणी पित असल्याची नागपुरात अफवा
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 2:11 PM

नागपूर : एकवीसाव्या शतकात सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली असताना, जवळपास सर्वच शिक्षित असताना देखील अनेक ठिकाणी अंधश्रद्धेचा वावर दिसतो. त्यातही अनेक शहरी भागात अशा प्रकारचे उदाहरण ऐकायला मिळतात. विदर्भातील नागपुरात (Nagpur) एक वेगळीच अफवा पसरली आहे. महादेवाचा नंदी दूध आणि पाणी पित असल्याची अफवा नागपुरात वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी त्यावर विश्वासही ठेवायला सुरुवात केली. यावर अंधश्रद्धेला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Andhashraddha Nirmoolan Samiti) पदाधिकाऱ्यांना एक निर्णय घेतला. जो कुणी नंदी दूध आणि पाणी पितो, हे सिद्ध करुन दाखवल, त्याला 25 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी केली आहे.

अंधश्रद्धा कधी संपेल?

आपण एकविसाव्या शतकात आहोत. मात्र, अजूनही अंधश्रद्धा काही संपल्याचे दिसत नाही. राज्यातील अनेक भागात आजही अंधश्रद्धेला बळी पडत असलेल्या लोकांची कमी नाही. राज्यातील ग्रामीण भागात असे प्रकार दिसूनच येतात. पण, शहरातही अंधश्रद्धा फोफावतेय. आता याला आळा बसण्यासाठी गरज आहे जनजागृतीची. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

इतर बातम्या

VIDEO | मुख्यमंत्री देवेंद्र… दत्तामामा पुन्हा अडखळले, टेंशनमध्ये असतो माणूस, भरणेंकडून पांघरुण

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिकांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

VIDEO : नेत्याच्या गाडीवर चप्पल फेकणं महाराष्ट्राची संस्कृती नाही : Rohit Pawar