मैत्रिणीच्या नावाने चिडवल्यानं थेट रक्ताचा सडा! मित्रानेच असा खून केला की…नागपुरात भयानक कांड!
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नागपूरमध्ये ही घटना घडली आहे. मित्राने सतत मैत्रिणीवरुन डिवचल्यामुळे आपल्या भावांना बोलावून घेतलं. आता नेमकं काय झालं होतं वाचा...

महाराष्ट्रातील नागपुरात शनिवारी (३ जानेवारी) रात्री एका साध्या मस्करीने हिंसक वळण घेतले आणि २२ वर्षीय युवकाचा जीव गेला. पार्वती नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मित्राला मैत्रिणीवरुन चिडवल्याने झालेला वाद टोकाला पोहोचला. मृत मित्राचे नाव रितिक सावनलाल पटले आहे. त्याची हत्या करण्यात आली. तर अन्य ४ युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री अंदाजे ११:३० वाजता पार्वती नगर चौकाजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिक पटले हा आपला मित्र तानशु नागपुरेसोबत घराबाहेर बसला होता. त्याच वेळी मुस्तफा उर्फ गोलू अंसारी तेथे आला आणि दोघांना दारू पिण्यासाठी सोबत येण्यास सांगितले. जेव्हा दोघांनी नकार दिला, तेव्हा मुस्तफाने त्यांना मोटारसायकलवर जबरदस्तीने सोबत नेल्याचा आरोप केला आहे. परत येताना तानशुने मुस्तफाच्या मैत्रिणीवरुन मस्करी केली, त्यामुळे वाद विकोपाला गेला आणि भांडण सुरू झाले. “माझी गर्लफ्रेंड मला २० हजार रुपये देऊ शकते’, या वादातून बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी मित्राने भावांना बोलवून लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
फोन कॉलनंतर वाढला वाद
वादानंतर काही वेळाने लुकमान अंसारीने तानशुला फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. प्रकरण शांत करण्याच्या उद्देशाने रितिक, तानशु आणि त्यांचा आणखी एक मित्र आरोपींशी बोलण्यासाठी गेले. मात्र तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या ६ जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला
आरोपींनी लोखंडी रॉड आणि चाकूने तिघांवर सपासप वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रितिकच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हल्ल्यात जखमी झालेल्या अन्य युवकांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात ईशा हातिम अंसारी, तिचा मुलगा मुस्तफा उर्फ गोलू अंसारी, लुकमान अंसारी, साहिल अंसारी आणि सलाउद्दीन अंसारी यांना अटक केली आहे. याशिवाय एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
