कोरोना रुग्णांवर होणार नाकाद्वारे उपचार, नागपुरात चाचणी सुरु, उपचार पद्धती ‘गेम चेंजर’ ठऱणार ?

गजानन उमाटे

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 3:51 PM

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फैलाव हा नाकाद्वारे होते. त्यामुळे आता कोरोनावर नाकाद्वारे उपचार करण्यासाठी एक विशेष पद्धत विकसित करण्यात येत आहे. या पद्धतीच्या मानवी चाचणीला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात परवानगी मिळालीय.

कोरोना रुग्णांवर होणार नाकाद्वारे उपचार, नागपुरात चाचणी सुरु, उपचार पद्धती  'गेम चेंजर' ठऱणार ?
CORONA SPRAY

Follow us on

नागपूर : कोरोना विषाणूचा सर्वाधिक फैलाव हा नाकाद्वारे होते. त्यामुळे आता कोरोनावर नाकाद्वारे उपचार करण्यासाठी एक विशेष पद्धत विकसित करण्यात येत आहे. या पद्धतीच्या मानवी चाचणीला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात परवानगी मिळालीय. ही पद्धत कोरोनाचे इन्फेक्शन तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे

कोरोनावर स्प्रेच्या स्वरुपात औषध, नागपुरात चाचणी

भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला कोरोना या विषाणूने ग्रासले आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झालाय. कोरोनाला थोपवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक वेगवेगळ्या उपचार पद्धती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारे एका उपचार पद्धतीच्या चाचणीचे प्रयोग नागपुरातदेखील केले जात आहे. नागपुरात चाचणी करण्यात येत असलेली उपचार पद्धती ही स्प्रेच्या स्वरूपात आहे. या उपचार पद्धतीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल जगातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहे.

दिवसातून सहा वेळा स्प्रेच्या माध्यमातून औषध

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधाची तसेच उपचार पद्धतीची याची ट्रायल घेतली जात आहे. एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर 48 तासांच्या त्याच्या नाकात हा नेझल स्प्रे मारला जातो. दिवसातून सहा वेळा स्प्रेच्या माध्यमातून हे औषध दिले जाते. पाच दिवस ठराविक अंतरावर हा स्प्रे मारायचा आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णावर याची ट्रायल घेण्यात येत आहे.

देशभरात 306 ठिकाणी केली जात आहे चाचणी

त्यानंतर आठव्या दिवशी त्याची RTPCR चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी झाल्यानंतर 28 दिवस त्या रुग्णाला अंडर ओबाझर्वेशन ठेवण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीमध्ये देशभरातून 306 रुग्णांवर ही ट्रायल घेतली जात आहे. पहिल्या दोन टप्प्यातील ट्रायलचे रिझल्ट सकारात्मक आल्याने डॉक्टरांच्या अपेक्षा उंचावल्या आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे औषधीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांच्या नेतृत्वात ही ट्रायल सुरू आहे.

इतर बातम्या :

नागपूर ZP पोटनिवडणूक | शिवसेनेचा काँग्रेस विरोधात प्रचार, तर भाजपची मदार बावनकुळेंवर

नागपुरातून बुलेट, पल्सर सारख्या महागड्या दुचाकी चोरायचे, मध्यप्रदेशात विक्री, पोलिसांकडून मोठ्या गँगचा पर्दाफाश

यशस्वी अँजियोप्लास्टीनंतर पीआरपी नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर

(new treatment method for corona patient medicine through by nose trial start in nagpur)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI