Sangharsh Yatra | जुनी पेन्शन संघर्ष यात्रा गडचिरोलीत, 30 जिल्हे संपर्क करून यात्रेचा सेवाग्राममध्ये होणार समारोप

गडचिरोली जिल्ह्यात सामूहिक रजा टाकून राज्य सरकारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. फॅमिली पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि जुनी पेन्शन लागू करणे या 3 प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी मैदानात उतरले असल्याचं महा. राज्य जुनी पेन्शन हक्क संघर्ष समितीचे समन्वयक वितेश खांडेकर यांनी सांगितलं.

Sangharsh Yatra | जुनी पेन्शन संघर्ष यात्रा गडचिरोलीत, 30 जिल्हे संपर्क करून यात्रेचा सेवाग्राममध्ये होणार समारोप
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 12:25 PM

गडचिरोली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन संघर्ष यात्रा आज गडचिरोलीत दाखल झाली. राज्यातील 30 जिल्हे संपर्क करून यात्रेचा सेवाग्राम येथे समारोप होणार आहे. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना NPS अन्यायकारक नवी पेन्शन योजना लागू झाली आहे. ही पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी मारक असल्याने जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. येत्या 22 नोव्हेंबर रोजी अधिवेशन काळात मुंबईजवळ कल्याण येथून विधिमंडळावर पायी मार्च काढण्याचाही कर्मचारी संघटनांचा निर्धार आहे.

यवतमाळ येथून दाखल झालेल्या यात्रेचा चंद्रपूर-गडचिरोली- भंडारा- गोंदिया – नागपूर आणि वर्धा असा उर्वरित प्रवास असणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सामूहिक रजा टाकून राज्य सरकारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. फॅमिली पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि जुनी पेन्शन लागू करणे या 3 प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी मैदानात उतरले असल्याचं महा. राज्य जुनी पेन्शन हक्क संघर्ष समितीचे समन्वयक वितेश खांडेकर यांनी सांगितलं.

सेवाग्राम येथे होणार समारोप

राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 पासून लागलेल्या शासकीय, निमशासकीय शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, लिपिकवर्गीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेला कडाडून विरोध करीत सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. राज्यभरातील 60च्या वर कर्मचारी संघटना एकत्र येत जुन्या पेंशन संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत कर्मचाऱ्यांची 22 नोव्हेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथून निघालेली पेन्शन संघर्ष यात्रा कर्मचाऱ्यांच्या न्याय जुनी पेन्शनचा जागर करत 8 डिसेंबर 2021 ला उमरेड येथे पोहचली. समारोप वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे होणार आहे.

60 च्या वर विविध संघटना एकत्र

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून जवळपास 60 च्या वर विविध संघटनांनी एकत्रित येत जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती तयार केली. संघर्ष समितीने शासनाविरुद्ध पुकारलेल्या त्रिस्तरीय आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आझाद मैदान मुंबई ते सेवाग्राम वर्धा पेन्शन संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक जिल्हात जावून पेंशनचा जागर या यात्रे द्वारा करण्यात आला.

कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध

जुनी पेन्शन हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा संवैधानिक अधिकार असून शेअर बाजार आधारीत NPS/DCPS पेन्शन योजनेच्या ताब्यात कर्मचाऱ्यांचे भविष्य देण्यास राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. सर्व संवर्गाच्या सरकारी अधिकारी, कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना संघर्ष यात्रेत सहभागी असून राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी. 1 नोव्हेंबर 2005 पासून सरकारने कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून त्यांचे भविष्य अंधकारमय केले आहे. अनेक कर्मचारी राज्यांमध्ये दरम्यानच्या काळात मृत झालेले आहेत. त्यांची कुटुंब मरण यातना सोसत आहेत. पण सरकार त्यांना कोणतीही मदत करत नाही. नोकरीची तीस वर्षे प्रामाणिक सेवा केल्यानंतर म्हातारपणी कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी कोणापुढे हात पसरावे? कर्मचाऱ्यांचे असुरक्षित झालेले भविष्य सुरक्षित करण्यासाठी जुनी पेन्शन योजना हाच पर्याय आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून लढा पुढे आला आहे.

पेन्शन संघर्ष यात्रेत सहभागी संघटना

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी यूनियन, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजी पाटील), मंत्रालयीन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजी), शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र पशूचिकित्सा व्यवसायी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर वर्ग 4 कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटना, विदर्भ पटवारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद रेखाचित्र अभियांत्रिकी कर्मचारी संघटना, पेन्शन बचाव कृती समिती, शिक्षक महासंघ, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, नागपूर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी वर्ग 4 संघटना, महाराष्ट्र राज्य राष्ट्रसेवा आरोग्य सेवक कर्मचारी संघटना, भारतीय कामगार सेवा महासंघ, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय शिक्षक संघ, म्हाडा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, शिक्षक संघर्ष संघटना, महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य वनविभाग कर्मचारी संघटना, मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी, शिक्षक सहकार संघटना, गव्हरमेंट प्रेस कर्मचारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, MFUCTO संघटना, महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन कृती समिती फेडरेशन, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना, जिल्हा परिषद रेखाचित्र अभियांत्रिकी कर्मचारी संघटना र. नं. 2593, पेन्शन बचाव कृती समिती, शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ, आदिवासी कर्मचारी संघटना, विदर्भ शिक्षक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, AIFUCTO संघटना, नर्सेस फेडरेशन, नर्सेस युनियन व इतर संघटना.

Nagpur Crime | कौटुंबिक कलह घेऊन पोहोचला ठाण्यात, तिथेच ह्रदविकाराच्या झटक्यानं युवकाचा मृत्यू

Nagpur Corona | धोका ओमिक्रॉनचा : विदेशातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी अनिवार्य, पॉझिटिव्ह आल्यास होणार जीनोम सिक्वेन्सिंग

Nagpur | विदर्भातील 38 नगरपंचायतीच्या 105 जागांना फटका, ओबीसी आरक्षणाच्या जागांवर स्थगिती

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.