Nagpur Corona | धोका ओमिक्रॉनचा : विदेशातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी अनिवार्य, पॉझिटिव्ह आल्यास होणार जीनोम सिक्वेन्सिंग

एखादा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास त्याची जीनोम सिक्वेन्सिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाचे सॅम्पल मेडिकल, मेयो अथवा एम्समध्ये पाठविण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.

Nagpur Corona | धोका ओमिक्रॉनचा : विदेशातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी अनिवार्य, पॉझिटिव्ह आल्यास होणार जीनोम सिक्वेन्सिंग
प्रातिनिधीक फोटो

नागपूर : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरात विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी अनिवार्य आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित प्रवाशाची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात यावी, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएंटचा धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणांच्या तयारी संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (ता. 7) विशेष बैठक घेतली. मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्यासह सर्व झोनल आरोग्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

द. आफ्रिका, झिम्बॉंबे, बोत्सवाना हे देश हायरिस्क

जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बॉंबे, बोत्सवाना हे देश ओमिक्रॉनचे हायरिस्क देश ठरले आहेत. अशा स्थितीत या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांबाबत विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. विमानतळावर अथवा कोणत्याही मार्गाने या तिन्ही देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष स्क्रिनिंग व तपासणी करिता वेगळी व्यवस्था करणे गरजेचे आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. चाचणी दरम्यान एखादा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास त्याची जीनोम सिक्वेन्सिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाचे सॅम्पल मेडिकल, मेयो अथवा एम्समध्ये पाठविण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. उपरोक्त तीनही हायरिस्क देशांव्यतिरिक्त अन्य देशातूनही येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेची सर्व रुग्णालय सज्ज करण्यात आले आहेत. रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा, पीपीई किट, ऑक्सिजन आदी व्यवस्था मुबलक प्रमाणात करून घेण्यात यावी. शहरात कुठल्याही प्रकारची वैद्यकीय आपात्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्यासोबत सामना करण्यास मनपाची आरोग्य यंत्रणा आधीच सज्ज असावी, अशीही सूचना यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व झोनल आरोग्य अधिकाऱ्यांना केली.

Nagpur | विदर्भातील 38 नगरपंचायतीच्या 105 जागांना फटका, ओबीसी आरक्षणाच्या जागांवर स्थगिती

Skin Care Tips : हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी ‘हे’ फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा! 

बदलला नाही तर आपोआप बदल होईल, भाजप खासदारांना मोदींचा सुचक इशारा, टोपीवरही राजकारण

Published On - 10:12 am, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI