Nagpur cat | मांजरीचा वावर जीवावर उठला, कीटकनाशकाचा डबा सांडवला, विष चाटल्यानं बाळाचा मृत्यू

कपाटावर चढलेल्या मांजराने विषाचा डबा खाली पाडला. त्यामुळे विष घरात पसरले. खाली खेळत असलेल्या निरागस रियांश विषाने माखलेले हात शरीरावर लावतानाच अनवधानाने तेच हात तोंडात घातले.

Nagpur cat | मांजरीचा वावर जीवावर उठला, कीटकनाशकाचा डबा सांडवला, विष चाटल्यानं बाळाचा मृत्यू
विष चाटल्यानं मृत्यू झालेला दीड वर्षीय रियांश

नागपूर : घरी मांजर पाळत असाल तर जरा सावध व्हा. कारण ती काय करेल काही सांगता येत नाही. मुंबईत मांजरानं बाळाला चिखलातून बाहेर काढलं. त्याचा जीव वाचविला. पण, नागपुरात मांजरानं कीटकनाशकाचा डबा खाली पाडला. त्यातून विष बाहेर पडलं. ते दीड वर्षाच्या बाळानं चाटलं नि त्याचा मृत्यू झाला.

 

बाबा घराबाहेर, आई घरकामात व्यस्त

कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. समतानगर मलका कॉलनीत अजय पाटील राहतात. ते शेती करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतात फवारणी करण्यासाठी कीटकनाशक आणून ठेवले होते. त्यांनी विषाचा डबा कपाटावर ठेवला. सोमवारी दुपारी ते घराबाहेर होते तर त्यांची पत्नी घरकामात व्यस्त झाली. दीड वर्षांचा त्यांचा रियांश नामक चिमुकला घरात खेळत होता.

खासगीतून मेयो रुग्णालयात उपचार

कपाटावर चढलेल्या मांजराने विषाचा डबा खाली पाडला. त्यामुळे विष घरात पसरले. खाली खेळत असलेल्या निरागस रियांश विषाने माखलेले हात शरीरावर लावतानाच अनवधानाने तेच हात तोंडात घातले. काही वेळाने रियांशची आई घरात आली. तिने चिमुकल्याला उचलून त्याचे हात धुतले. आंघोळही घालून दिली. काही वेळानंतर विषाने प्रभाव दाखवला. चिमुकल्याची प्रकृती बिघडली. प्रारंभी त्याला खासगी आणि नंतर मेयोत दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी बाळाचा मृत्यू झाला, अशी माहिती कपीलनगरच्या पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी दिली. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Nagpur Corona | परदेशी प्रवासी आल्यास मनपाला कळवा, चाचणी करून घ्या-प्रशासनाचं आवाहन

Nagpur Municipal Corporation | ओबीसी इच्छुकांची चिंता वाढली, दावेदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता

MLC Election | 10 डिसेंबरला मतदान, तीन उमेदवारांचे भाग्य ठरविणार 560 मतदार


Published On - 5:00 pm, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI