5

Nagpur | बाबासाहेबांच्या वस्तुसंग्रहालयासाठी पाठपुरावा; विभागीय आयुक्तांचे आश्वासन, चिंचोली शांतीवनाला भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयासह इतर सर्व विकासकामे नागपूर सुधार प्रन्यासमार्फत सुरु आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच नासुप्रचे सभापती यांनाही येथील येणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

Nagpur | बाबासाहेबांच्या वस्तुसंग्रहालयासाठी पाठपुरावा; विभागीय आयुक्तांचे आश्वासन, चिंचोली शांतीवनाला भेट
चिंचोली येथील शांतीवनाची पाहणी करताना विभागीय आयुक्त.
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 6:34 PM

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तू व साहित्यांचा बहुमूल्य वारसा चिंचोली येथील शांतीवन येथे जतन करण्यात आला आहे. यासाठी वस्तुसंग्रहालयासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या विकासकामांसंदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन व्हावे

चिंचोली येथील शांतीवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तुंचे जतन तसेच या वस्तू दीर्घकाळ टिकण्यासाठी सुरु असलेल्या प्रकल्पाची पाहणी श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी काल केली. तसेच येथील निर्माणाधीन असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. भारतीय बौद्ध परिषदेचे विश्वस्त संजय पाटील, भन्ते डॉ. जी. नागराजन, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे आणि भाग्यशाली गजभिये आदी यावेळी उपस्थित होते.

अकरा एकराचा परिसर

शांतीवन येथील संग्रहालय परिसर सुमारे अकरा एकराचा आहे. या ठिकाणी विपश्यना केंद्र, प्रशिक्षण केंद्र तसेच अभ्यासिकासुद्धा तयार करण्यात येत आहे. यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. वस्तुसंग्रहालयाचा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. आवश्यक सुविधांसाठी शासनस्तरावर निधी मंजूर करताना आवश्यक त्रुटींची पूर्तता करावी लागणार आहे. यासंदर्भात मंत्रालयस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याची ग्वाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली.

विकासकामे नासुप्रतर्फे सुरू

शांतीवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले, संपादित केलेले ग्रंथ सर्वसामान्य जनतेसाठी तसेच युवकांसाठी उपलब्ध व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथसंपदेचे विक्रीकेंद्र सुरु करण्याबाबत पुढाकार घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयासह इतर सर्व विकासकामे नागपूर सुधार प्रन्यासमार्फत सुरु आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच नासुप्रचे सभापती यांनाही येथील येणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

Nagpur | संरक्षण दल प्रमुखांचा मृत्यू दुर्दैवी, सत्ताधाऱ्यांनी अपघाताची माहिती द्यावी; विजय वडेट्टीवार यांचं मत

Akola MLC बाजोरिया-खंडेलवाल यांच्यात थेट लढत; वंचितकडे गुलालाची चाबी? उद्या होणार मतदान

Nagpur | जय संताजी ! संत जगनाडे महाराजांना अभिवादन; कीर्तन, अभंगाच्या माध्यमातून दिली शिकवण

Non Stop LIVE Update
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?
राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?
कल्याण-ठाकुर्लीतील बाप्पांचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून, पण का?
कल्याण-ठाकुर्लीतील बाप्पांचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून, पण का?
'लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू', पडळकरांच्या टीकेवर अजितदादा थेट म्हणाले
'लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू', पडळकरांच्या टीकेवर अजितदादा थेट म्हणाले
राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, '... म्हणून नव्या संसदेची उभारणी?'
राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, '... म्हणून नव्या संसदेची उभारणी?'