Nagpur Crime | नागपुरात रेती चोरांचा कहर, महसूल कर्मचाऱ्यांवर ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयत्न; 16 जणांवर गुन्हे

ट्रॅक्टर नेत असताना महसूल विभागाच्या कर्मचार्‍याच्या अंगावर चालविण्याचा प्रयत्न केला. दोन ट्रॅक्टर पारडी भागातून शोधण्यात आले. खापरखेडा पोलिसांनी इलू अंसारीसह तीन ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतले.

Nagpur Crime | नागपुरात रेती चोरांचा कहर, महसूल कर्मचाऱ्यांवर ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयत्न; 16 जणांवर गुन्हे
महसूल कर्मचाऱ्यांवर ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयत्नImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 9:57 AM

नागपूर : जिल्ह्यात रेती चोरांचा सुळसुळाट झालाय. रोज लाखो रुपयांच्या महसुलाची चोरी केली जात आहे. महसूल कर्मचारी लिपीक आणि कोतवालावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. नागपूर जिल्ह्यातील वलनी (Valani) येथे ही घटना घडली. घटनास्थळावरुन पळून गेलेले ट्रॅक्टर नागपुरातून जप्त केले. खापरखेडा पोलिसांचे इल्लू अन्सारीसह (Illu Ansari) 16 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. लिलाव न होताच नागपूर जिल्ह्यातील अनेक घाटांवर रेती तस्करी सुरू आहे. सावनेरचे तहसीलदार (Savner Tehsildar) सोमवारी रात्री गस्त घालत होते. पहाटे रेतीचे उत्खनन आणि वाहतूक करीत असलेले तीन ट्रॅक्टर त्यांनी पकडले. वलनीतील रेती चोरट्यांनी महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांवर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न केला. खापरखेडा पोलिसांना माहिती देण्यात आली. ही कारवाई सावनेर तालुक्यातील वलनी पोलीस चौकी परिसरातील कन्हान रेती घाट भागात केली.

तीन ट्रॅक्टर चालक ताब्यात

महसूल विभागाचे कर्मचारी आपले काम करत होते. रेतीमाफियांनी त्यांना चाकू, डंडे आणि लोखंडी रॉड दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या ताब्यातील दोन टॅक्टर पळविले. ट्रॅक्टर नेत असताना महसूल विभागाच्या कर्मचार्‍याच्या अंगावर चालविण्याचा प्रयत्न केला. दोन ट्रॅक्टर पारडी भागातून शोधण्यात आले. खापरखेडा पोलिसांनी इलू अंसारीसह तीन ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतले. या प्रकरणी महसूल विभागाचे कनिष्ठ लिपिक अमोल देशपांडे यांच्या तक्रारीवरून रेती तस्कर इलू अंसारी आणि त्याचे इतर 16 साथीदारांवर कलम 379, 353, यासह इतर गुन्हे दाखल करण्यात आलेत.

एकच ट्रॅक्टर रेतीघाटावर सापडले

तहसीलदार प्रताप वाघमारे, मंडल अधिकारी राजेश वखारे, कनिष्ठ लिपिक अमोल देशपांडे, कोतवाल नितीन वानखेडे, कोतवाल श्रीकांत केने खासगी गाडीने वलनीत आले. वलनी रेती घाटावरून रेती वाहतूक करीत असलेले दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ही माहिती रेती तस्करांना लागली होती. रेतीघाटावरून पाचपेक्षा अधिक ट्रॅक्टर रेतीचे उत्खनन करून रेती चोरी करीत होते. तहसीलदारांचे पथक रेतीघाटावर गेले. चार ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. घटनेच्यावेळी फक्त एकच ट्रॅक्टर रेतीघाटावर सापडले.

Chandrasekhar Bavankule | ऊर्जा मंत्रालयाच्या खासगीकरणाचा प्रयत्न; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, विदर्भात 18, मराठवाड्यात 11 प्रकल्प जलविद्युत प्रकल्प?  

Buldana Market | महागाई आणि चारा टंचाईमुळे जनावरे विक्रीस, खामगाव बाजारात कवडीमोल भाव

Video Wardha Fire | वर्ध्यातील गादी कारखान्याला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान; काटोलमधील आगीत वृद्ध ठार

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.