जोशी जाणार, तिवारी येणार, नागपुरात भाजपा काय करणार?

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सध्या बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे नागपूर महानगरपालिका महापौर संदीप जोशी आज (21 डिसेंबर) महापौरपदाचा राजीनामा दिला आहे.

जोशी जाणार, तिवारी येणार, नागपुरात भाजपा काय करणार?
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 5:57 PM

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सध्या बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे नागपूर महानगरपालिका महापौर संदीप जोशी आज (21 डिसेंबर) महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. आधीच ठरल्याप्रमाणे त्यांचा 13 महिन्यांचा कालावधी आज पूर्ण होत आहे. त्यामुळे ते राजीनामा देत आहे. यानंतर भाजपकडून महापौर पदावर भाजप नेते दया शंकर तिवारी यांना संधी दिली जाईल (Sandeep Joshi resign from Mayor Daya Shankar Tiwari will be next Nagpur Mayor).

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच महापौर निवडीच्यावेळी 13 महिने संदीप जोशी आणि 13 महिने दया शंकर तिवारी महापौर राहतील, असं सूत्र ठरलं होतं. त्याप्रमाणेच आता भाजपच्या पालिका सत्तेत खांदेपालट होत आहे. महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले.

तेलही गेलं, तूपही गेलं; आधी महापालिका निवडणुकीत माघार, आता संदीप जोशींनी पदवीधर मतदारसंघही गमावला

दरम्यान, गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाला (Nagpur Graduate Constituency Election) काँग्रेसने सुरुंग लावलाय. विधान परिषद निवडणुकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड असलेल्या नागपुरातच भाजपचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला खिजवून दाखवलं जातंय. मात्र यामध्ये भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांची सर्वात मोठी अडचण झाली.

अनिल सोलेंच्या जागी महापौरांना उमेदवारी

महापौर संदीप जोशींनी यापुढे कोणतीही महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनिल सोले (Anil Sole) यांचं तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. परंतु जोशींना भाजपचा बालेकिल्ला राखता आला नाही. संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी (Abhijit Vanjari) मोठ्या फरकाने विजयी झाले.

महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा

“आपण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. यापुढे आपण पुन्हा निवडणूक लढवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी द्याल?” असा सवाल एका कार्यकर्त्याने संदीप जोशी यांना फेसबुक लाईव्हदरम्यान विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचं 20 ऑगस्टला आपल्या वाढदिवशी स्पष्ट केलं होतं. (BJP Candidate Nagpur Mayor Sandeep Joshi left with no option after Nagpur Graduate Constituency Election defeat)

काय म्हणाले होते संदीप जोशी?

“अनेकदा नेत्यांनीच लढायचं आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलत राहायचं हे बरोबर नाही. मला वाढदिवसानिमित्त तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि हा प्रश्नदेखील विचारलात. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आज मी कॅमेऱ्यासमोर जाहीर करतो की, यानंतर मी महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. माझ्यानंतरचा जो कुणी कार्यकर्ता असेल, जो पक्षासाठी मेहनत करतोय, तो कार्यकर्ता माझ्या जागेवर लढेल. मी त्याचं काम करेन. पण यापुढे महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही”, असं संदीप जोशी म्हणाले होते.

तेलही गेलं तूपही गेलं

आता संदीप जोशी यांची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं अशी झाली आहे. जाहीर घोषणा केल्यामुळे त्यांना आगामी नागपूर महापालिकेची निवडणूक लढवणं जिकीरीचं जाईल. विधानपरिषदेची संधीही गेल्यामुळे नगरसेवकपदाचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पुनर्वसनासाठी थेट विधानसभा निवडणुकीचा पर्याय असू शकेल.

हेही वाचा :

नागपूरचे महापौर संदीप जोशी राजीनामा देण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळ

तेलही गेलं, तूपही गेलं; आधी महापालिका निवडणुकीत माघार, आता संदीप जोशींनी पदवीधर मतदारसंघही गमावला

भाजपचा बालेकिल्ला 55 वर्षांनी खालसा, नागपूर पदवीधर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा, अभिजीत वंजारी विजयी

Sandeep Joshi resign from Mayor Daya Shankar Tiwari will be next Nagpur Mayor

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.