AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन विषयात पैकीच्या पैकी मार्क; सर्वच विषयात हुशार; तरीही विद्यार्थ्याला केले ‘नापास’, उच्च न्यायालयाने मग नागपूर विद्यापीठाचा घेतला ‘क्लास’

Nagpur University : नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका हुशार विद्यार्थ्याला नागपूर विद्यापीठाने सर्व विषयात पास असताना नापास ठरवण्याचा प्रताप केला आहे. नागपूर विद्यापीठाच्या कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहे. तर विद्यापीठ आणि संबंधीत महाविद्यालयाला नोटीस बजावली आहे.

तीन विषयात पैकीच्या पैकी मार्क; सर्वच विषयात हुशार; तरीही विद्यार्थ्याला केले 'नापास', उच्च न्यायालयाने मग नागपूर विद्यापीठाचा घेतला 'क्लास'
पास विद्यार्थी नापास
| Edited By: | Updated on: Aug 14, 2025 | 1:52 PM
Share

High Court Slammed Nagpur University : नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. तीन विषयात पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यालाच विद्यापीठाने नापास ठरवले. एका हुशार विद्यार्थ्याला अशी वागणूक दिल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे इतर विषयात सुद्धा या मुलाने प्राविण्य मिळवले आहे. सर्व विषयात पास असताना नापास ठरवण्याचा प्रताप नागपूर विद्यापीठाने केला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली असता नागपूर खंडपीठाने विद्यापीठाची पिसं काढली. कडक शब्दात सुनावले. उच्च न्यायालयाने विद्यापीठाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे. तर विद्यापीठ आणि संबंधीत महाविद्यालयाला नोटीस बजावली आहे.

पठ्ठ्याने पाडला गुणांचा पाऊस

सर्वेश घोटाळे या गुणवंत विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. त्याला तीन विषयात १०० पैकी १०० गुण, उरलेल्या पाच विषयांत ८० ते ९० टक्के गुण मिळाले आहे. तरीही नागपूरातील सर्वेश घाटोळे या BA च्या विद्यार्थ्यांला नापास करण्याचा चमत्कार नागपूर विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा सर्वेश घाटोळे या विद्यार्थ्यासोबतंच नागपूरातील वसंतराव नाईक महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना सहन करावा लागलाय.

मग ठोठावला खंडपीठाचा दरवाजा

सर्वेश याला न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. सर्वेश घाटोळे हा वसंतराव नाईक म्हणजेच मॅारीस महाविद्यालयातील बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याला समाजशास्र, मराठीमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले. इतर पाच विषयात त्याला ८० ते ९० टक्के गुण आहे. पण मार्क्सशीट आली तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण इतके गुण घेऊनंही त्याला नापास दाखवण्यात आले.

त्याने आपल्या महाविद्यालयात तक्रार केली काही फायदा झाला नाही, विद्यापीठात तक्रार केली न्याय मिळाला नाही. शेवटी त्याने हायकोर्टात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने त्याला न्याय दिला, विद्यापीठ आणि कॅालेज प्राचार्याला नोटीस बजावली. आता या प्रकारानंतर आपली उरली सुरली लाज विद्यापीठ शाबूत ठेवेल आणि विद्यार्थ्याला नवीन गुणपत्रिका तातडीने देईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडून चुकीबद्दल खेद व्यक्त करण्याच्या आशेवर सुद्धा पाणी सोडले आहे, त्यांना केवळ त्यांची नवीन सुधारीत उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका हवी आहे.

Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात