Rohit Sharma : हिटमॅनने घेतली 5 कोटींची आलिशान कार; पण प्लेटवर 3015 हा नंबर का? काय आहे ते खास कनेक्शन?
Rohit Sharma Lamborghini Urus SE : या आलिशान कारची इलेक्ट्रिक रेंज 60 किमी आहे. ईव्ही मोडवर ही कार ताशी 130 किमीच्या वेगाने धावू शकते. पण या कारच्या नंबर प्लेटची खास चर्चा होत आहे. 3015 या नंबरचे काय आहे कनेक्शन?

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा मैदानावर तडाखेबंद खेळीसाठी ओळखल्या जातो. त्याला कारची पण आवड आहे. माजी भारतीय कर्णधारकडे निळ्या रंगाची Lamborghini Urus ही त्याच्या गॅरेजमधील लोकप्रिय कारमधील एक कार होती. हिटमॅनने ही जुनी Urus नवीन अपडेटेड लॅम्बोर्गिनी उरूस SE मध्ये बदलली आहे. या दमदार SUV ची किंमत 4.57 कोटी (एक्स-शोरूम) इतकी आहे. या आलिशान कारची इलेक्ट्रिक रेंज 60 किमी आहे. ईव्ही मोडवर ही कार ताशी 130 किमीच्या वेगाने धावू शकते. पण या कारच्या नंबर प्लेटची खास चर्चा होत आहे. 3015 या नंबरचे काय आहे कनेक्शन?
SUV वर खास नंबर प्लेट
लाल रंगाची ही एसयुव्ही चांगलीच चर्चेत आहे. रोहितच्या लॅम्बोर्गिनी उरूस एसईवर एक खास नंबर प्लेटे आहे. त्यावर 3015 हा क्रमांक आहे. हा क्रमांक त्याच्या कुटुंबाशी नातं सांगतो. यापूर्वी त्याच्या कारचा क्रमांक हा 264 असा होता. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्याने 264 धावांचा विश्व विक्रम केला होता. त्यानिमित्ताने त्याने हा क्रमांक घेतला होता. तर आता त्याने घेतलेली लॅम्बोर्गिनी उरूस एसई सध्याच्या एसयुव्हीमधील दमदार मॉडेल आहे. यामध्ये 800 हॉर्स पॉवरचे इंजिन आहे. तर 950 एनएमचे ती टॉर्क जनरेट करते. ही कार अवघ्या 3.4 सेकंदात ताशी 0 ते 100 किमीच्या वेगाने धावू शकते.
Lamborghini Urus SE फीचर्स आणि इंजिन
रोहित शर्माने नवीन Lamborghini Urus SE खरेदी केली. 23 इंचाच्या अलॉय व्हील्ससह त्याने नारंगी रंगाला पसंती दिली आहे. Lamborghini Urus SE मध्ये 4.0-लिटर, ट्विन-टर्बोचार्ज्ड व्ही8 इंजिन आहे, जे 25.9 किलोवॅट प्रति तास लिथियम-आयन बॅटरी पॅकसह प्लग-इन हायब्रिड सिस्टमसाठी पुन्हा डिझाइन केलेले आहे. यामध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी इलेक्ट्रिक मोटर आहे. नवीन पॉवरट्रेनचे पॉवर आउटपुट 789 बीएचपी आणि 950 एनएम पीक टॉर्क आहे.
3015 या नंबरशी काय कनेक्शन
तर रोहित शर्माच्या या नवीन लेम्बोर्गिनी ऊरस एसई पेक्षा त्याच्या कारच्या नंबर प्लेटची अधिक चर्चा आहे. त्याने 3015 हा क्रमांक का निवडला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. या नवीन लेम्बोर्गिनी कारची किंमत 4.57 कोटी रुपये इतकी आहे. त्याने 3015 हा क्रमांक का निवडला यामागे एक कारण आहे. 3015 हा त्याच्या दोन मुलांची जन्म तारीख आहे. त्या दिवशी त्यांचे वाढदिवस येतात. तर या नंबरची एकूण बेरीज ही 45 इतकी होते. हा रोहित शर्माच्या जर्शीचा नंबर आहे.
