Virat Kohli : निवृत्तीची अफवा; मग विराट कोहलीने तो फोटो केला पोस्ट, चाहत्यांना मिळाले उत्तर
Virat Kohli retirement : भारताचा तडफदार आणि आक्रमक खेळाडू विराट कोहली याने टी20 आणि कसोटीतून निवृत्तीची अगोदरच घोषणा केली आहे. आता त्याच्या एकदिवसीय सामन्यातील निवृत्तीची चर्चा रंगली आहे. त्याचवेळी त्याने तो फोटो पोस्ट केल्याने चाहत्यांना पुढील वाटचालीचे उत्तर मिळाले आहे.

भारताचा दमदार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली याने टी20 आणि कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता तो एकदिवसीय क्रिकेटला सुद्धा अलविदा म्हणणार का, असा सवाल विचारल्या जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याविषयी ना ना तर्क वितर्क देण्यात येत आहे. बांगलादेशाविरोधातील ऑगस्ट महिन्यातील वनडे सीरीज रद्द झाली आहे. आता ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या विरोधात टीम इंडियाची मालिका आहे. ही एकदिवसीय मालिका विराटच्या करिअरसाठी महत्त्वाची मानण्यात येत आहे. आता तो वनडे क्रिकेटमधून सुद्धा निवृत्ती घेणार का, याचे उत्तर मिळाले आहे. स्वतः कोहलीने एक फोटो पोस्ट करत त्याची माहिती दिली.
नेट प्रॅक्टिस एकदम जोमात
विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर इनडोअर नेट प्रॅक्टिस करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. तो गुजरात टायटन्सचे सहायक कोच नईम अमीन यांच्यासोबत दिसला. त्यांच्यासोबत कोहली याने घाम घाळला. त्याने सराव केला. कोहलीने हा फोटो समाज माध्यमावर शेअर केला आहे. ‘भाऊ, मला चेंडू टोलवण्यास मदत केल्याबद्दल तुझे आभार. तुला पाहुन नेहमीच चांगले वाटते’, अशी कॅप्शन सुद्धा त्याने लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपण आगामी दौऱ्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे कोहलीने संदेश दिला आहे.

एकदिवसीय सामना खेळणार असल्याचे संकेत
कोहलीने या पोस्टच्या माध्यमातून तो एकदिवसीय सामना खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. एका क्रिकेट फॅन पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला. त्यात थेट ऑस्ट्रेलिया वनडे सीरीजची तयारी सुरु असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या पोस्टला स्वतः कोहलीने पण लाईक केली आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असेल याची खात्री त्याने चाहत्यांना दिली आहे.
ऑस्ट्रेलिया सीरीज निर्णायक
19 ते 25 ऑक्टोबर या दरम्यान ऑस्ट्रेलियाची वनडे सीरीज होत आहे. या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे खेळतील की नाही याविषयी संभ्रम आहे. हे दोघेही एकतर या मालिकेपूर्वी निवृत्तीची घोषणा करतील अथवा ही मालिका झाल्यानंतर ते निवृत्तीची घोषणा करतील असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यामुळे जर या दौऱ्यात ते सहभागी झाले तर पुढील करिअरसाठी त्यांना या मालिकेत करिष्माई खेळी करावी लागणार आहे.
