शरद पवारांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा अ‍ॅडमिट का केलं? प्रकृती कशी? रोहित पवारांनी दिली अपडेट

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून ही केवळ नियमित तपासणी आहे. बाहेरच्या दौऱ्यांमुळे व्हायरल इन्फेक्शनची शक्यता असल्याने तपासण्या करण्यात येत आहेत.

शरद पवारांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा अ‍ॅडमिट का केलं? प्रकृती कशी? रोहित पवारांनी दिली अपडेट
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 10:26 AM

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना काल रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पवार पुण्यातून मुंबईत आले होते. पण रात्री अचानक तब्येत बिघडल्याने पवारांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या नॉर्मल असून त्यांना केवळ तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिली आहे.

आमदार रोहित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात नॉर्मल तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. दर 4 ते 5 महिन्यानंतर त्यांची तपासणी करावी लागते. दुसरीकडे बाहेर दौऱ्यावर असताना वायरल इन्फेक्शन झाल्याची शक्यता असू शकते. त्या अनुषंगाने नॉर्मल तपासणी करण्यात आली आहे. मुंबईत आल्यावर पुन्हा एकदा त्यांच्या चाचण्या करून घ्याव्यात, असं सुप्रियाताई आणि घरच्यांचं म्हणणं होतं. त्यामुळेचं मुंबईत ब्रीच कँडीला त्यांना नेण्यात आलं, असं रोहित पवार म्हणाले.

Loading...

पवारांचे दौरे रद्द

दरम्यान, शरद पवार यांचे सर्व दौरे रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलं. या वयात सुद्धा दुष्काळाच्या काळात परिस्थिती समजून शेतकरी आणि शेतमजुरांसाठी ते न्यायच्या मागणीसाठी लढत असतात. त्यामुळेच त्याची काहीशी तब्येत बिघडल्यामुळचं त्यांना तो दौरा रद्द करावा लागलाय. त्यांचा कार्यकर्ता म्हणून आज माझ्याकडे वय आहे, म्हणून शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीसाठी मी हा दौरा काढला आहे. काल नाशिक-बुलढाण्यात मी होतो. आज अकोल्यात आणि सायंकाळी अमरावतीत असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पवारांना काय झालं?

शरद पवार यांना कफचा त्रास झाला आहे. थोडा संसर्ग झाला आहे आणि त्यांना थकवा जाणवत असल्याने त्यांना पुण्यात रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आलं होतं. पण मुंबईतही तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा ब्रीच कँडीत दाखल करण्यात आलं आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us