Video Nagpur Fire | चंद्रपुरातील कचरा डेपोपाठोपाठ नागपुरात आग; महाकालीनगरातील झोपडपट्टी आगीच्या कवेत

सकाळी दहाच्या सुमारात ही आग लागली. त्यामुळं झोपडपट्टीतील नागरिक घराबाहेर आले. पण, घरातील सामान बाहेर काढू शकले नाही. एका झोपडीपासून लागलेली आग दुसऱ्या झोपडपट्ट्यांना पेटवत गेली. संपूर्ण झोपडपट्टी आगीच्या विळख्यात आली.

Video Nagpur Fire | चंद्रपुरातील कचरा डेपोपाठोपाठ नागपुरात आग; महाकालीनगरातील झोपडपट्टी आगीच्या कवेत
नागपुरातील महाकालीनगर झोपडपट्टीला लागलेली आग. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 1:32 PM

नागपूर : नागपूरच्या बेलतरोडी (Beltarodi) परिसरातील झोपडपट्टीमध्ये आज सकाळी आग लागली. सिलिंडर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या (Fire Department) 10 ते 12 गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आगीचं तांडव सुरू आहे. दहा-बारा गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरू आहे. बेलतरोडी परिसरात महाकालीनगर झोपडपट्टी (Mahakalinagar Slum) आहे. येथील एक झोपडीला आग लागली. ही आग पसरत गेली. त्यामुळं इतर झोपड्याही जळाल्या. त्यामुळं आगीचे लोळ आकाशात दिसते होते. या ठिकाणी सुमारे शंभर झोपड्या आहेत. सात-आठ सिलिंडरचा स्फोट याठिकाणी झाला. प्रत्यक घरी सिलिंडर होते.

झोपडपट्टी आगीच्या विळख्यात

सकाळी दहाच्या सुमारात ही आग लागली. त्यामुळं झोपडपट्टीतील नागरिक घराबाहेर आले. पण, घरातील सामान बाहेर काढू शकले नाही. एका झोपडीपासून लागलेली आग दुसऱ्या झोपडपट्ट्यांना पेटवत गेली. संपूर्ण झोपडपट्टी आगीच्या विळख्यात आली. या आगीनं रोद्र रूप धारणं केलं. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलंय. कुलिंगचं काम सुरू आहे. ४० ते ५० झोपडपट्या जळाल्याचा अंदाज आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सद्या कुठहीली जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

हे सुद्धा वाचा

कपड्याच्या मशीनसह सर्व खाक

या आगीत एका झोपडपट्टीतील महिलेच्या घराला आग लागली. तिच्याकडं कपड्याची दुकान होती. शिवाय पाच मशीन होत्या. या आगीत सर्व काही जळाले. घरचा टीव्ही गेला. संपूर्ण घर जळून खाक झाल्यानं ती ओक्सीबोक्सी रडत होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला.

चंद्रपुरातही धुमसतेय आग

चंद्रपुरात पहाटे कचऱ्याच्या डेपोला आग लागली. या आगीनंही सर्व डेपो कवेत घेतला. शेडसह सर्वकाही जळून खाक झाले. ही आगसुद्धा अद्याप नियंत्रणात येऊ शकली नाही. एकीकडं उन्हाची लाहीलाही आहे. दुसरीकडं आगीच्या घटना घडत आहेत. घरी काही झालं तर आग तर लागणार नाही, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.