AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | उन्हाळा आल्याने शितपेय विक्रेते सक्रिय, अन्न व्यवसायिकांनी कायद्याचा भंग केल्यास कडक कारवाई

शितपेय विक्री करताना त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळं अन्न व औषध प्रशासन विभागाला सतर्क राहावं लागतं. अन्न व्यावसायिकांनी कायद्याचा भंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय.

Nagpur | उन्हाळा आल्याने शितपेय विक्रेते सक्रिय, अन्न व्यवसायिकांनी कायद्याचा भंग केल्यास कडक कारवाई
नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला.Image Credit source: tv 9
| Updated on: Mar 18, 2022 | 3:54 PM
Share

नागपूर : सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळं फ्रुट, ज्युस, शरबत, लस्सी शितपेय विक्रेते शहरामध्ये जागोजागी अन्न व्यवसाय करीत आहेत. सगळ्यांनी शुध्द पाण्यातून बनविलेल्या बर्फाचा वापर करावा. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत परवाना व नोंदणी करून व्यवसाय करावा. या बाबींचे उल्लंघन केल्यास अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) यांनी दिले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षित व सकस आहाराबाबत जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अन्न व औषध प्रशासनाचे (Food and Drug Administration) सहायक आयुक्त अ. प्र. देशपांडे, अन्न विश्लेषक अ. अ. उपलप, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मृदुला मोरे, उद्योग केंद्राचे व्यवस्थापक (Industry Center) तुषार आठवले, उपशिक्षणाधिकारी साबिरा शेख, ग्राहक कल्याण समितीचे नीलेश नागोलकर, जनमंचचे प्रमोद पांडे, ऑईल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश ठक्कर, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे आदी यावेळी उपस्थित होते.

शाळेपासून शंभर मीटरवर हवे दुकान

शाळेच्या शंभर मीटर परिसरात सुगंधित तंबाखु, पानमसाला, गुटखा विक्री करणाऱ्या विक्रत्यांवर कारवाई करण्यात येते. यासाठी अन्न व औषधी प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यावर लवकरच धडक मोहीम राबविण्याच्या सूचना सदस्यांना दिल्या. शासनाने खाद्य बर्फ पाण्यापासून बनविले जावे. ते रंगहीन असावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अखाद्य बर्फ उत्पादकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

खाद्यतेलाचा पुनर्वापर धोकादायक

अन्न पदार्थ तयार करताना खाद्यतेलाचा वारंवार तळण्यासाठी होणारा पुनर्वापर मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे आयुक्त देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळे मानवास कॅन्सर, ह्दयविकारासह इतरही आजार उद्भवू शकतात. यानुषंगाने कार्यशाळेचे आयोजन नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशन महाल येथे करण्यात आले होते. ज्या अन्न व्यवसायिकांचे दैनंदिन खाद्यतेलाचे वापर पन्नास लिटरपेक्षा जास्त आहे, अशा अन्न व्यवसायिकांना वापर झालेल्या तेलाचा व उरलेल्या तळलेले तेलाचा अभिलेखा ठेवण्याबाबत सूचना कार्यशाळेत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Chandrapur Crime | मुलाचा राग काढला बापावर, कुऱ्हाडीने पाडला मुडदा, न्यायालयाने सुनावली जन्मठेप

Vijay Vadettiwar | कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत, चंद्रपुरात 132 महिलांना धनादेश

Bhandara Holi | होळी पेटली पण लाकडांची नव्हे कचऱ्याची! भंडाऱ्यातील गवराळ्यात रंग न उधळता भक्तीत रंगणार गाव

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.