फडणवीस यांच्या नागपुरातच भाजपला जबरदस्त धक्का, शिक्षक मतदारसंघात नागो गाणार पराभूत, काय Update?

महादेव कांबळे, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 02, 2023 | 4:34 PM

पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीत सुधाकर आडबाले यांना 14 हजार 61 मतं मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधात उभा असलेल्या नागो गाणार यांना 6 हजार 309 मत मिळाली आहेत.

फडणवीस यांच्या नागपुरातच भाजपला जबरदस्त धक्का, शिक्षक मतदारसंघात नागो गाणार पराभूत, काय Update?

नागपूरः नागपुरमध्ये भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयी झाल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपप्रणित उमेदवार नागो गाणार आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवलेले सुधाकर आडबाले यांच्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची जोरदार चुरस लागली होती. राज्यातील 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने निकाल हाती येत आहेत.

आता नागपूर विभागाच निकाल लागताच, त्यामध्ये भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

नागपूर विभागातील उमेदवार नागो गाणार यांच्या पेक्षा दुप्पट मतं सुधाकर आडबाले यांनी घेत आपल्या विजयावर शिक्का मोर्तब केला.

त्यांच्या विजयाची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर करताच काँग्रेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी जोरदार जल्लोष साजरा केला.

अमरावती आणि नाशिक पदवीधर आणि नागपूर, कोकण आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल जाहीर होत आहे. त्याच धर्तीवर आज नागपूर विभागाचा निकाल हाती येताच महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांसह सर्वांनीच जोरदार जल्लोष केला आहे.

महाविकास आघाडीसाठी हा विजय महत्वाचा होता कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा बालेकिल्ला म्हणून नागपूरकडे बघितले जाते.

त्यामुळे पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाजपप्रणित असलेला उमेदवारच जिंकणार असल्याचे ठामपणे सांगितले जात होते.

तर ज्या सुधाकर आडबाले यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी जोरदार लढा उभारला केला होता. त्याच जुन्या पेन्शन योजनेचा या निवडणुकीत फायदा झाल्याचे सुधाकर आडबाले यांनी सांगितले.

पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीत सुधाकर आडबाले यांना 14 हजार 61 मतं मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधात उभा असलेल्या नागो गाणार यांना 6 हजार 309 मत मिळाली आहेत.

या विजयाबद्दल बोलताना सुधाकर आडबाले यांनी सांगितले की, गेल्या कित्येक दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लावून धरली आहे.

तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही जुनी पेन्शन योजनेसाठी मागणी केली होती, मात्र त्यांनी त्या योजनेला साफ नकार दिला होता. तर आताच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबरच मित्र पक्षांनी आपल्याला मदत केल्यामुळेच आपण निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI