कोव्हिड काळात नागपुरातील खासगी रुग्णालयांविरुद्ध 580 तक्रारी, किती तक्रारी निकाली?

सुनील ढगे

| Edited By: |

Updated on: Jun 30, 2021 | 1:18 PM

कोव्हिड काळात नागपूर शहरातील खासगी रुग्णालयाविरुद्ध 580 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 496 तक्रारी नागपूर महापालिकेने निकाली काढल्या आहेत. याबाबतचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहेत (Total 580 complaints against private hospitals in Nagpur during Covid NMC settles 496 complaints).

कोव्हिड काळात नागपुरातील खासगी रुग्णालयांविरुद्ध 580 तक्रारी, किती तक्रारी निकाली?
Nagpur Municipal Corporation
Follow us

नागपूर : कोव्हिड काळात नागपूर शहरातील खासगी रुग्णालयाविरुद्ध 580 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 496 तक्रारी नागपूर महापालिकेने निकाली काढल्या आहेत. याबाबतचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहेत (Total 580 complaints against private hospitals in Nagpur during Covid NMC settles 496 complaints).

कोरोना रुग्णांकडून अवाजवी शुल्क घेतल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. त्यावर महापालिकेने हे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले आहे.

मार्च ते मे महिन्यात नागपुरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. या काळात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड मिळणेही कठीण होऊन गेले होते. अशा कठीण काळात खासगी रुग्णलयांकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी या तक्रारी महापालिकेकडे केल्या होत्या.

कोरोना संदर्भांत उपाययोजना आणि इतर मुद्द्यांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतः याचिका दाखल केली होती. कोरोना काळात रुग्णालयांकडून जादा शुल्क घेतल्याच्या महापालिकेला एकूण 580 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 496 तक्रारींचा निपटारा करण्यात आला.

यापैकी 84 तक्रारी संबंधित रुग्णालयांना पाठवल्या आहेत. या तक्रारींचा देखील लवकरच निपटारा करण्यात येईल. तर 4 रुग्णालयांनी अजूनही उत्तर सादर केले नसल्याचे महापलिकने आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

नागपुरात आज लसीकरण बंद

कोव्हिशील्ड लसीचा साठा नसल्याने नागपूर शहरात आज लसीकरण बंद आहे. लस नसल्याने गेल्या सात दिवसांत तिसऱ्यांदा नागपुरातील लसीकरण बंद ठेवण्याची नामुश्की नागपूर महानगरपालिकेवर ओढवलीय. आज शहरातील केवळ तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस देण्यात येतेय. इतर सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प असल्याने, लोकांना निराश होऊन लसीकरण केंद्रांवरुन परत जावं लागतंय.

नागपुरातील डेल्टा प्लसच्या संशयितांच्या अहवालाची प्रतिक्षा

नागपुरातील डेल्टा प्लसच्या संशयितांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. डेल्टा प्लसचे 10 संशयित रुग्ण उमरेडच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत. अहवाल पॅाझिटीव्ह आल्यास मेडिकल, मेयोमध्ये दाखल करण्यात आले आहेत. उमरेडच्या एकाच घरातील 10 जणांना कोरोनाची झपाट्याने लागण झाली. त्यामुळे निरीने नमुने हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

Total 580 complaints against private hospitals in Nagpur during Covid NMC settles 496 complaints

संबंधित बातम्या:

Nagpur Corona Update | नागपूरकरांना दिलासा, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, मॉल्स बंद, दुकानं 4 वाजेपर्यंत सुरु, सोमवारपासून नागपुरात नवे निर्बंध

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI