Vijay Vadettiwar :… त्यांना तर आभाळातून ज्ञान, विजय वडेट्टीवार यांचा मनोज जरांगेंना सणसणीत टोला, नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार निशाणा
Vijay Vadettiwar on manoj Jarange: कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्यावरून मनोज जरांगे यांनी सरकारवर संताप व्यक्त केलेला आहे. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे पाटलांना सणसणीत टोला लगावला आहे. जरांगे यांच्या प्रतिक्रियेवरून वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.

मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी आणि इतरांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याच्यवेळी नागपूरमधून काँग्रेस नेत विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंवर तोफ डागली आहे. ते जी भाषा वापरत आहेत, त्यावरून काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी त्यांना सुनावले आहे.
त्यांचं ज्ञान आभाळातून आलेलं
वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंवर निशाणा साधला. त्यांचं ज्ञान आभाळातून आलेलं आहे. पुस्तकी ज्ञान असंत तर ते असं बोलले नसते. खोटे प्रमाणपत्र दिल्यामुळे लोकांचा वेळ वाया जात आहे. मुलांच्या आयुष्याशी खेळ बंद करा. ओबीसींना आरक्षण संविधानातून मिळालेलं आहे. जरांगेंमुळे २-३ मंत्री गेले होते, ८-१० मंत्री जातील, ते खुर्ची टाकून बसतील असा विखेंना त्यांनी टोला लगावला. ते आता जरांगेंची दाढी कुरवाळतील, असा आरोप त्यांनी केला. कायद्याच्या चौकटीत काय मिळवायचं ते मिळवा, धमकी देऊ नका असा निशाणा त्यांनी साधला.
ओबीसींची खरी संख्या कळावी
मुख्यमंत्र्यांनी जातनिहाय जनगणना करु असं सांगितलं मात्र तसं होताना दिसत नाही. जनगणना करावी यासाठी मंडल यात्रेतून जनजागृती केली. आमच्या हक्काच्या सोयी सवलती आम्हाला मिळाव्या, ओबीसी खरी संख्या कळावी, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. बांठिया आयोगापासून सगळे ओबीसी गणना बोगस असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसींना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळावी असे ते म्हणाले. अंबादास दानवे हे मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला अंबादास दानवे जात असतील
तर हा सूचक इशारा असू शकतो. त्यांचा पक्ष संघासोबत जात असतील तर ते सांगतील, त्यांच्या पक्षाने ते जाहीर करावं, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. सरकारच्या गृह खात्याविरोधात जिथे जिथे मायलेज घेता येईल तिथे त्या पोहोचतात अशी टीका त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केली.
रस्त्याच्या स्थितीवरून सरकारवर निशाणा
नॅशनल हायवेशी स्थिती कमिशन खोरीची आहे. ४० टक्के कमिशन खालं तर काय रस्त्याची स्थिती राहिल. ठेकेदार तुम्हाला गिट्टी देत असेल तर रस्त्यावर मातीच दिसेल. ठेकेदाराला पैसे मिळत नाही त्यामुळे ते काम करत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची चाळण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी टक्के घेऊन निधी वितरीत करण्याच्या धंद्याकडे बघावं, असे ते म्हणाले.
शरद पवार यांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र आमचं लक्ष आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, पटेल भेटले या सगळ्यावर चर्चा झाली. पवार ज्येष्ठ आहेत, ते भेटत असतील तर ठीक आहे, पण बाकीचे लोक का भेटत आहेत? असा सवाल करत डीलिमिटेशनवर काही प्लानिंग असावी. भाजप अजगर एकएक पक्ष गिळंकृत करतोय, असा आरोप त्यांनी केला.