AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: त्यांना काय घंटा कळतंय? हाके आणि सदावर्तेंना मनोज जरांगे यांचा टोला, म्हणाले त्यांचा मराठा समाजात फुट पाडण्याचा डाव

Manoj Jarange Patil: कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील कमालीचे संतप्त झालेले आहे. ते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोलापूरमध्ये पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडले. तर प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला.

Manoj Jarange: त्यांना काय घंटा कळतंय? हाके आणि सदावर्तेंना मनोज जरांगे यांचा टोला, म्हणाले त्यांचा मराठा समाजात फुट पाडण्याचा डाव
मनोज जरांगे पाटील
| Edited By: | Updated on: Aug 09, 2026 | 8:29 AM
Share

मराठवाड्यातील नवीन कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. ते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याविषयीचे पत्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 29 ऑगस्ट रोजीपासून अंतरवाली सराटीत मोठ्या आंदोलनासाठी मराठ्यांनी तयार राहावे असे आवाहन त्यांनी केले. तर प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली.

आपल्यावर हल्ल्याचा डाव

मुख्यमंत्री फडणवीसांचे ऐकूनच बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र खरे असूनही रद्द करण्याचे काम केले आहे. प्रमाणपत्रे रद्द का केलीत? हे फडणवीस आणि शिंदे यांनी सांगावे. फडणवीसांनी नवे डाव रचले आहेत. रोड बंदोबस्त धाराशिव पासून बंद केला.माझ्यावर हल्ला झाला पाहिजे. दगडफेक झाली पाहिजे. हाणामारी व्हावी असा डाव रचलाय, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला.

हाके, सदावर्तेंना काय घंटा कळतं?

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे मोठा नेता असल्याचा दावा करत प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर टीका केली. सदावर्तेंनी तर काल एक गाणंही गायलं. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी दोघांवरही निशाणा साधला. या दोघांना काय घंटा कळतं? असा टोला त्यांनी हाणला. कुणबी प्रमाण पत्र रद्द करण्याचे बावनकुळेनी केलेल्या कामाची कल्पना फडणवीसांना असणारच. फडणवीसांच्या सरकारमध्ये एकाही मंत्र्याला स्वत:ची भाकर खायचे देखील अधिकार नाहीत, असा आरोपी त्यांनी केला.

सांगोल्यात कॉर्नर सभा

पंढरपुरच्या सरकोली गावात काल रात्री मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. तर आज सकाळी ते पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे. आज सांगोल्यात जरांगे पाटील यांची दुपारी तीन वाजता कॉर्नर सभा आहे. मंत्री बावनकुळेंच्या चेहर्‍यावर (वर्णावर)एकेरी टीका करत समाजाच्या लेकराचं वाटोळे करणार्‍याला कसला आला वर्ण? आम्ही बावनकुळेच्या वाट्याला गेलो नव्हतो. बहुमतामुळे डोक्यात हवा गेलीय. सत्ताधाऱ्यांना माज आला आहे. सत्ताधाऱ्यांचा माज उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करा

मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून निर्णायक लढा देणार आहे. आता माघार नाही. भले राज्यातील सरकार राहिले काय अन् गेले काय आम्हाला काही फरक पडत नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. काल त्यांनी सोलापूर आणि तुळजापूर परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांत समाज बांधवांशी संवाद साधला. अंतरवाली आंदोलनाने मुंबई जाम झाली की सरकारला कळ लागते. तोवर लागत नाही. आता मेलो तरी बेहत्तर पण माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?