बुलडाण्यात घेता येणार आता वाघोबाचे दर्शन, तिन्ही अभयारण्य जंगल सफारीसाठी खुले

बुलडाणा जिल्ह्यातील तिन्ही अभयारण्य जंगल सफारीसाठी खुले करण्यात आल्यानं वाघोबाचे दर्शन पर्यटकांना घेता येणार आहे. शासनाच्या नवीन निर्देशानुसार पुन्हा जंगल सफारी झाली सुरू झाली आहे.

बुलडाण्यात घेता येणार आता वाघोबाचे दर्शन, तिन्ही अभयारण्य जंगल सफारीसाठी खुले
ज्ञानगंगा अभयारण्य.
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 5:15 PM

बुलडाणा : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता. त्यामुळं शासनाने अनेक निर्बंध लागू केले होते. त्यापैकी एक म्हणजे जंगलसफारी बंद (Jungle safari closed) करण्याचा. 10 जानेवारीपासून जंगल सफारीवर सुद्धा बंदी आली होती. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील तिन्ही अभयारण्यात जंगल सफारी बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला. त्यामुळं राज्य शासनानं अनेक निर्बंध शिथिल (Many restrictions relaxed) केलेत. त्यानुसार आता पर्यटक जंगल सफरीचा आनंद घेऊ शकतात. ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार (Gyanganga, Ambabarwa and Lonar) हे तिन्ही अभयारण्य सुरू झाले आहेत. त्यामुळं जंगल भ्रमंती करणाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आता जंगलात मोकळा श्वास घेऊ शकणार असल्याचं पर्यटक सांगतात. गाईड्स तसेच पर्यटन व्यवसायावर आधारित रोजगार निर्मिती पुन्हा सुरू होणार आहे.

पलढग धरणातील बोटिंगकडे पर्यटकांचा कल

बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा तसेच लोणार असे तीन अभयारण्य आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. विशेष म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्याकडे पर्यटकांचा कल वाढलेला आहे. या अभयारण्यात पलढग धरणात बोटिंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक बेरोजगार युवकांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला आहे. मागील डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक वाढत होता. माणसामुळे वन्य प्राण्यांत या विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. त्यानुसार, जंगल सफारीवर बंदी आणण्यात आली होती. मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनीसुद्धा 10 जानेवारीला आदेश काढला. त्यानुसार, जंगल सफारी बंद केली होती.

3 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरुवात

ऐन हिवाळ्यात जंगल सफारी बंद झाली होती. त्यामुळं पर्यटकांचा हिरमोड झाला होता. आता कोरोनाची लाट ओसरत आहे. राज्य शासनाने अनेक नियमांत बदल केलाय. पर्यटनाला देखील परवानगी देण्यात आली आहे. या नवीन आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा, अंबाबारवा तसेच लोणार अभयारण्यात 3 फेब्रुवारीपासून पुन्हा जंगल सफारीला सुरुवात करण्यात आलेत. अशी माहिती बुलडाणा वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांनी दिली आहे.

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती

Tadoba Tiger | कोंडेगावात अवतरले वाघोबा; ग्रामस्थांनीच बदलला मार्ग, जंगलाबाहेर येण्याचे कारण काय?

मेळघाटातील बालमृत्यूची धक्कादायक आकडेवारी; सहा महिन्यांत पंधरा मातांच्याही मृत्यूची नोंद

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.