त्यांची तर जीभ छाटली पाहिजे, संजय गायकवाड यांच्या शेतकऱ्यांवरील वक्तव्यावर संताप, काँग्रेस नेता म्हणाला काय?

Vijay Wadettiwar on Sanjay Gaikwad: आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मयताला सुद्धा जाऊ नका असे वक्तव्य करून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी वाद ओढावून घेतला. शिंदे सेनेतूनच त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत असताना आता काँग्रेसच्या बड्या नेत्यांना त्यांच्यावर जहाल प्रतिक्रिया दिली.

त्यांची तर जीभ छाटली पाहिजे, संजय गायकवाड यांच्या शेतकऱ्यांवरील वक्तव्यावर संताप, काँग्रेस नेता म्हणाला काय?
त्यांची तर जीभ छाटली पाहिजे, संजय गायकवाड यांच्या शेतकऱ्यांवरील वक्तव्यावर संताप, काँग्रेस नेता म्हणाला काय?
| Updated on: Oct 30, 2026 | 11:00 AM

Vijay Wadettiwar on Sanjay Gaikwad: “शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास त्याच्या मयताला, अंत्यसंस्काराला कोणीही जाऊ नये. त्यांची बॉडी जनावरं खातील, तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि ते आत्महत्या करणार नाही.” असे वादग्रस्त वक्तव्य बुलढाण्याचे खासदार संजय गायकवाड यांनी केले. ते गेल्या काही वर्षांपासून अशा बेताल वक्तव्याने वाद ओढावून घेण्याच्या स्पर्धेत अव्वल आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नाराज असल्याची माहिती समोर येत असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर जहाल प्रतिक्रिया दिली आहे.

गायकवाड यांच्यावर तडक कारवाई करा

Loading...

सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, राज्यातील संकटात सापडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा अवमान करण्याचे काम आमदारांनी केले आहे. हा शेतकऱ्यांचा एवढा मोठा अपमान आहे. सरकारकडून हा अपमान झाल्याचे आम्हाला वाटते. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर सरकार या विधानाशी सहमत आहे का? सरकार सहमत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करावी. या दुःखात शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू दिसत असतील, शेतकऱ्यांबद्दल जाणीव असेल, तर त्यांच्यावर कारवाई करावी. सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे गायकवाड यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

त्यांची जीभ छाटली पाहिजे

शेतकऱ्यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला आमदार म्हणून राहण्याचा काहीही अधिकार नाही. ज्या पक्षात ते काम करत आहेत, त्या पक्षातून त्यांचे निलंबन केले पाहिजे. पुढील कारवाई सरकारने केली पाहिजे. सरकारने डिसेंबरच्या अधिवेशनात प्रस्ताव आणून त्यांना निलंबित केले पाहिजे. ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही ते अनेकदा खालच्या भाषेत बोलले आहेत. त्यांच्या शब्दांना मर्यादा नाही. अशांची जीभ छाटली पाहिजे, अशी जहाल प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

धनगेकरांना चिमटा

राज्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र येऊ शकतात. हे राजकारण आहे, असे रविंद्र धंगेकर म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ते मला माहीत नाही. धनगेकर यांना त्यांच्या अनुभवावरून माहीत असेल. गाडी थांबवून त्यांना सिग्नल मिळालेला आहे, असा चिमटा त्यांनी काढला. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. आजपर्यंत कधीही टँकरमध्ये पाणी नव्हते, आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बांधकामाला परवानगी दिली आहे काय? त्यांना समजायला पाहिजे की, या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. महानगरपालिकेने परवानगी द्यायला हवी होती का? सरकारने या प्रस्तावाला परवानगी दिली होती का? या संदर्भातील परवानगी रद्द केली पाहिजे. कोट्यवधी रुपये घेऊन या संदर्भातील व्यवहार झालेला आहे, म्हणून परवानगी मिळाली आहे. चंद्रपूरमधील कॉल वॉशरीज बंदी घातली पाहिजे लवासा प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते, असे ते म्हणाले.

डेटा सेंटरचे पाणी बंद करा

६६ टक्के डेटा सेंटर महाराष्ट्रात आहेत. या डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. यावरही सरकारने पुन्हा विचार केला पाहिजे. यापुढे कुठलेही डेटा सेंटर निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. एक मेगावॉट वीज लागत असेल, तर त्यात सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा आहे. अदानी आणि अंबानी यांनी या ठिकाणी डेटा सेंटर उभे केले आहेत. जूनपर्यंत पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. डेटा सेंटरवर बंदी आणावी. आम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहोत आणि ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

शालार्थ आयडी घोटाळा

मध्य प्रदेशातील भरती घोटाळ्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे. दहा कोटींचा व्यवहार पुढे आलेला आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात मुंबई, पुणे, नाशिक सर्वत्र मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.हिंदी विकास विद्यालयातील भाजप तालुकाध्यक्षांनी शालार्थ आयडीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला आहे. सरकार त्यांना वाचवत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा भाजप तालुकाध्यक्षांनी स्वतःच्या पत्नीची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करून दिली. १२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती बोगस पद्धतीने केली. ते क्रिकेट चालवत आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक लोक आतमध्ये जातील. विधानसभेतही हा विषय पुढे येणार आहे, अस वडेट्टीवार यांनी सांगितले.

जंगलतोड न करता विकास करा

भीमाशंकरनंतर रायगडमध्ये झाडांची कत्तल होणार आहे. नव्याने प्रस्ताव पुढे नेण्याचे काम सुरू आहे. तिथेही वादाची ठिणगी पडली आहे. ग्रामपंचायतीने कुठेही ठराव केलेला नाही आणि रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होणार आहे. वारंगीनंतर टोरंटो सह्याद्रीतील झाडे तोडल्यानंतर तिथे संभाजीनगरमधील अजिंठा परिसरात जंगल साफ करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. वीज निर्मिती केंद्र, उपवन आणि इतर ऐतिहासिक वारसा नष्ट करून आपण काय साध्य करत आहोत? पर्यावरणाचे नुकसान होत आहे. सातत्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल आणि पुढील पिढीचे नुकसान होईल. कुठलीही जंगलतोड न करता विकास केला पाहिजे, असे त्यांनी सुनावले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us