AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिशवीवर भाजपचे नाव, 52 पाकिटे अन् कारवर शिवसेना… महाराष्ट्रात कुठे काय घडतंय?

नालासोपारा विधानसभा क्षेत्रात मतदानापूर्वी पेल्हार पोलिसांनी १० लाख ९ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. बहुजन विकास आघाडीने शिवसेना आणि भाजपवर पैसे वाटपाचे गंभीर आरोप केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिशवीवर भाजपचे नाव, 52 पाकिटे अन् कारवर शिवसेना... महाराष्ट्रात कुठे काय घडतंय?
nalasopara money
| Updated on: Jan 13, 2026 | 1:45 PM
Share

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नालासोपारा विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वीच पैशांचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. पेल्हार पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत १० लाख ९ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता बहुजन विकास आघाडीने (बविआ) थेट शिवसेना आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पेल्हार ब्रिज परिसरात शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पेल्हार पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. यावेळी दोन तरुण दोन ॲक्टिव्हा गाड्यांवरून अत्यंत संशयास्पदरित्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना थांबवले. त्यांची झडती घेतली असता एका प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाच्या पाकिटांमध्ये रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम तब्बल १० लाख ९ हजार रुपये इतकी होती. या पैशांबाबत तरुणांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईनंतर बहुजन विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक १९ चे उमेदवार प्रफुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनासमोर काही धक्कादायक खुलासे केले. प्रफुल्ल पाटील यांनी आरोप केला की, हे पैसे ज्या दुचाकीस्वारांकडे सापडले, त्यांना ते एका आलिशान फॉर्च्युनर गाडीतून देण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या फॉर्च्युनर गाडीवर शिवसेना जिल्हाध्यक्ष अशी पाटी लावलेली होती.

आमच्या कार्यकर्त्यांनी या दोन ॲक्टिव्हा चालकांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे दोन पिशव्या होत्या. एका पिशवीत प्रभाग निहाय पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या याद्या होत्या, तर दुसऱ्या पिशवीवर स्पष्टपणे भाजपा असे लिहिलेले होते. या पिशवीत ५२ पांढऱ्या रंगाची पाकिटे होती, ज्यामध्ये मतदारांना वाटण्यासाठी पैसे भरले होते, असा गंभीर इशारा प्रफुल्ल पाटील यांनी दिला.

कॉल रेकॉर्ड्सची सखोल चौकशी सुरू

दरम्यान पेल्हार पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १७३ (निवडणुकीत लाच देणे किंवा स्वीकारणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी १० लाख ९ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन ॲक्टिव्हा दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध करत सत्ताधारी पक्षाकडून सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, सत्ताधारी गटाने हे आरोप फेटाळून लावले असून हा बदनामीचा कट असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि ताब्यात घेतलेल्या तरुणांच्या कॉल रेकॉर्ड्सची सखोल चौकशी सुरू आहे.

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नितेश राणेंचा रोड शो!
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नितेश राणेंचा रोड शो!.
हा दहशतवाद संपवायचाय! अशोक चव्हाण यांची एसआयटी चौकशीची मागणी
हा दहशतवाद संपवायचाय! अशोक चव्हाण यांची एसआयटी चौकशीची मागणी.
आमचा मागील रेकॉर्ड तोडू; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
आमचा मागील रेकॉर्ड तोडू; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास.
... तर तुम्हाला मिरची का झोंबली? संदीप देशपांडेंचा खोचक प्रश्न
... तर तुम्हाला मिरची का झोंबली? संदीप देशपांडेंचा खोचक प्रश्न.
लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंनी आणलीय, आता एक भाऊ क्रेडिट घेऊ पाहतोय;
लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंनी आणलीय, आता एक भाऊ क्रेडिट घेऊ पाहतोय;.
शेवटच्या दिवशीची रणधुमाळी! राज ठाकरेंचा पुण्यात प्रचार
शेवटच्या दिवशीची रणधुमाळी! राज ठाकरेंचा पुण्यात प्रचार.
राज ठाकरेंची पूर्णपणे जिरलीय... गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली
राज ठाकरेंची पूर्णपणे जिरलीय... गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली.
देवाभाऊ पब्लिकमध्ये... थेट बाईकवरून साधला संवाद... तुफान तुफान गर्दी
देवाभाऊ पब्लिकमध्ये... थेट बाईकवरून साधला संवाद... तुफान तुफान गर्दी.
... तर मी माझी दाढी काढून टाकणार! इम्तियाज जलील यांचं मोठं चॅलेंज
... तर मी माझी दाढी काढून टाकणार! इम्तियाज जलील यांचं मोठं चॅलेंज.
भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा.