AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा ताकदीने फडकेल, नाना पटोलेंचा विश्वास

पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, उपाध्यक्ष देविदास भन्साळी, अलकाताई रुपवते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा ताकदीने फडकेल, नाना पटोलेंचा विश्वास
nana patole
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 8:45 PM
Share

पुणे : पुणे हा काँग्रेस विचारांचा जिल्हा आहे, या जिल्ह्यात आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. सातत्याने काँग्रेसचा झेंडा या भागात फडकत राहिला आहे आणि यापुढेही तो तसाच फडकत राहील. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल त्यादृष्टीने काम करा. पुणे जिल्ह्याबरोबरच 2024 साली राज्यातही काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची मतं वाढली

पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, उपाध्यक्ष देविदास भन्साळी, अलकाताई रुपवते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नाना पटोले पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची मतं वाढली आहेत. पुणे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे, पुणे जिल्हा काँग्रेसचा पारंपरिक जिल्हा असून दुसऱ्यांना मागणार नाही, काँग्रेस येथे स्वबळावर लढेल, त्याची तयारी केली आहे. पुढचा काळ पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी चांगला काळ असेल. पक्ष संघटना मजबूत करा आपल्याला यश मिळेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

बीएसएनएलसह सर्वकाही विकायला काढले

केंद्रातील भाजपा सरकारने देश विकायला काढला आहे. रेल्वे, विमा कंपन्या, बँका, बीएसएनएल सर्वकाही विकायला काढले आहे. शेतकरी, कामगार यांना संपवायला निघाले आहेत. हा देश ‘हम दो’ हमारे दो’ असे चारजण मिळून चालवतात हे जनतेला आता समजले आहे. केंद्रातील सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने जनजागृती अभियान हाती घेतले आहे. काँग्रेस सामान्य माणसाला केंद्रीभूत माणून विकास केला पण आत्ताचे केंद्रातील सरकार सर्वकाही विकून टाकत आहे.

पहिला महत्त्वाचा निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला

काँग्रेसच्या काळात असलेला 350 रुपयांचा गॅस 1000 रुपये झाला. पेट्रोल डिझेल 100 रुपयांच्या वर गेले. राज्यातील आघाडी सरकार सत्तेत येताच पहिला महत्वाचा निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला. भाजपाच्या कर्जमाफीसारखं रांगेत उभे करून, वेगवेगळ्या याद्या करून, अनेकांना त्याचा लाभ मिळू नये म्हणून नियम, अटी लावल्या नाहीत तर सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी कर्जमाफी राबविली. शेतकऱ्यांना संकटात मोठी मदत केली, असेही पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, फिजीओथोरेपी व्यवस्थित सुरु असल्याची दिली माहिती

‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’, एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा सदाभाऊंना टोला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.