AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING : काँग्रेस तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करणार? नाना पटोले म्हणतात…

सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आपण भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं विधान केलंय.

BREAKING : काँग्रेस तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करणार? नाना पटोले म्हणतात...
फोटो सौजन्य : सत्यजित तांबे यांचं अधिकृत ट्विटर अकाउंट
| Updated on: Jan 12, 2023 | 6:53 PM
Share

मुंबई : नाशिकच्या (Nashik) राजकारणात आज मोठी घडामोड घडलीय. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील (MLC Election 2023) काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. सुधीर तांबे यांनी आपल्या मुलाला पाठिंबा दर्शवलाय. अर्थात दोन्ही पिता-पुत्र हे काँग्रेसच्या मुशीतले आहेत. त्यांचे काँग्रेस पक्षासोबत घट्ट नातं आहे. पण इथेच राजकारण थांबत नाही. कारण नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने (BJP) आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे ही भाजपची खेळी असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सत्यजित तांबे यांनी आपण भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं विधान केलंय. त्यामुळे आणखीनच गोंधळ वाढलाय. या राजकीय गदारोळात काँग्रेसची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. काँग्रेस आता तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करणार की सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. आता त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“राजकीय समीकरणात पुढे काय-काय होतात ते आपण बघू ना. पण ही जी घटना झालीय ती चांगली झालीय असं मी समजत नाही. म्हणून यावर सगळी माहिती घेऊनच प्रतिक्रिया देऊ”, अशी पहिली प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिलीय.

“सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरलाय असं सांगताय. त्यावेळी आमचे उमेदवार सुधीर तांबे यांची काय भूमिका होती, त्यांची काय परिस्थिती होती या सगळ्या घटना महत्त्वाच्या आहेत. कारण तिथे आमचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात होते. त्यामुळे नेमकं काय झालंय याची माहिती घेऊनच आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया देऊ”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“सुधीर तांबे यांनी दिलेली प्रतिक्रिया मी ऐकत होतो. मी सगळ्या गोष्टींची माहिती घेईन. काय झालं, नेमकी कारणं तरी काय? सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन, पक्ष पातळीवर चर्चा करुन, जे काही झालं त्यावर स्पष्टीकरण देऊ”, असं ते म्हणाले.

“सुधीर तांबे यांचं माझ्याशी कुठलं बोलणं झालेलं नाही. पण मी तुम्हाला सांगितलंय की, या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन आपल्याला माहिती कळवू”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“तांबे पिता-पुत्रांनी पक्षाला अंधारात ठेवून निर्णय घेतला का? याची माहिती घेऊन उत्तर देऊ”, असं ते म्हणाले.

“भारतीय जनता पक्षाचे लोकं काहीही बोलू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की, सगळी माहिती घेऊन वेळेवर प्रतिक्रिया देऊ”, अशी टीका त्यांनी केली.

“सत्यजित तांबे अपक्ष आहेत. त्यांनी काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे. माझ्या काँग्रेस पक्षाचे सुधीर तांबे उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी का फॉर्म भरला नाही सगळी माहित घेऊन प्रतिक्रिया देऊ”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.