Video | देश विकणारे दिल्लीत, भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर; पटोलेंचा घणाघात, अण्णा हजारेंबाबत काय म्हणाले…?

नाना पटोले म्हणाले की, मोदींनी माफी मागितल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही. आम्ही आंदोलनाचा आव आणत नाही आहोत. देश विकणारे सरकार दिल्लीत बसले आहेत. त्या सरकारला आमचा आवाज गेला पाहिजे. महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितलीच पाहिजे.

Video | देश विकणारे दिल्लीत, भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर; पटोलेंचा घणाघात, अण्णा हजारेंबाबत काय म्हणाले...?
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 11:25 AM

मुंबईः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत भाजपला घेरले आहे. भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आता समोर येतोय. कारण भाजपचे नेते चुकीच्या वक्तव्यांचे समर्थन करत आहेत. मोदींनी माफी मागावी, एवढी आमची भूमिका आहे. आम्ही हिसेंचे समर्थन करतोय, असे तर काहीच नाही. भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा आता जनतेसमोर आला आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत, अशा इशारा त्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे (Congress) कोरोना पसरल्याचे विधान संसदेत केले होते. या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी काँग्रेस जोरदार निदर्शने करतेय. एकंदर काँग्रसने या प्रकरणावरून भाजपला कोंडीत पकडले आहे.

काय म्हणाले नाना?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे कोरोना पसरल्याचे विधान संसदेत केले. आता भाजपचे नेते या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाय. आम्ही फक्त मोदींनी माफी मागावी इतकेच म्हणतोय. दुसरीकडे प्रसाद लाडांसारखे अण्णा हजारांच्या वक्तव्याचा आधार घेत आहेत. मात्र, आम्ही अण्णा हजारेंवर काहीच बोलायचं नाही, असं ठरवल्याचे ते म्हणाले.

आईवर शंका घ्यायलाही…

नाना पटोले म्हणाले की, प्रसाद लाड तुम्ही काल जे बोललात, ते सगळ्या महाराष्ट्राने ऐकले आहे. त्यामुळे तुमचे विचार काय, हे महाराष्ट्रात कळून चुकले आहे. आता आम्ही अण्णा हजारे साहेबांबाबत एकही शब्द बोलणार नाही. एखाद्या आईवर शंका घ्यायलाही हे लोक मागेपुढे पाहणार नाहीत. आता काहीही होवो. मोदींनी माफी मागितल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही. आम्ही आंदोलनाचा आव आणत नाही आहोत. देश विकणारे सरकार दिल्लीत बसले आहेत. त्या सरकारला आमचा आवाज गेला पाहिजे. महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.