मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाना पटोलो (Nana Patole) विरुद्ध भाजप (Bjp) संघर्ष तीव्र झाला आहे. मोदींबाबत (Pm Modi) नाना पटोलेंनी आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. तर मी पंतप्रधान मोदींबद्दल बोललोच नव्हतो असे नाना पोटेले सांगत आहेत. मात्र आता भाजपने आणखी आक्रमक होत नाना पटोलेंना मनोरुग्णाचे औषध पाटवल्याने हा संघर्ष आणखी वाढला आहे. भाजपच्या या औषधाला नाना पोटेले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी गावगुंडाबद्दल बोललो आहे, भाजपवाल्यांना काय आदळ आपट करायची ती करूदे, कोर्टात तक्रारी करू द्या, कोर्ट जो निर्णय देईल त्याचा आदर राखू असे नाना पोटोले म्हणालेत, तसेच चंद्रकांत पाटलांचे औषध चुकीच्या पत्त्यावर गेलंय, ते कोल्हापूरला गेलं पाहिजे होतं, असा टोला चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.