AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाणार पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांचे जाहीर संकेत

शिवसेना आणि ग्रामस्थांच्या विरोधानंतर हा प्रकल्प (Nanar project CM fadnavis) दुसरीकडे हलवण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं होतं. पण राजापूरमधील हा उत्साह पाहून प्रकल्प पुन्हा आणावा वाटतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विधान केलं.

नाणार पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांचे जाहीर संकेत
| Edited By: | Updated on: Sep 17, 2019 | 9:02 PM
Share

रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Nanar project CM fadnavis) यांनी मोठं विधान केलंय. शिवसेना आणि ग्रामस्थांच्या विरोधानंतर हा प्रकल्प (Nanar project CM fadnavis) दुसरीकडे हलवण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं होतं. पण राजापूरमधील हा उत्साह पाहून प्रकल्प पुन्हा आणावा वाटतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विधान केलं.

नाणारमध्ये येणारा प्रकल्प हा ग्रीन रिफायनरी आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. ज्या प्रकारे विरोध झाला, त्यामुळे आम्ही हा निर्णय थांबवला. पण हा उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी असं मला वाटतंय. आज मी कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला बोलावणार, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय होता?

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं.

हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे.

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे.

संबंधित बातम्या 

नाणार प्रकल्प अखेर रद्द, मुख्यमंत्र्यांची फाईलवर अखेरची सही   

एकच जिद्द रिफायनरी रद्द, नाणारवासियांचा निर्धार 

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.