AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोचा समोरच निपचित पडलेला देह… आभाळच कोसळलं… तरीही त्याने दिलं दोन महिलांना जीवदान; ट्रॅक्टर अपघाताची हृदयद्रावक कहाणी

नांदेड जिल्ह्यात एका भयानक अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला. भुईमूग निदाने जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. प्रत्यक्षदर्शीने दोन महिलांना वाचवलं, पण त्यांची पत्नी यात मृत्युमुखी पडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

बायकोचा समोरच निपचित पडलेला देह... आभाळच कोसळलं... तरीही त्याने दिलं दोन महिलांना जीवदान; ट्रॅक्टर अपघाताची हृदयद्रावक कहाणी
Nanded accident 2
| Updated on: Apr 04, 2025 | 2:57 PM
Share

नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. यात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या या परिसरात बचावकार्य सुरु आहे. आता या दुर्घटनेदरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेदरम्यान प्रत्यक्षदर्शी पुरभाजी सरोदे यांनी दोन महिलांना विहिरीतून बाहेर काढलं. मात्र यात त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा विहिरीत बडून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी पुरभाजी सरोदे यांनी थरारक घटनेचा घटनाक्रम सांगितला.

स्वतःच्या पत्नीचा विहिरीत बडून मृत्यू

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरी महिला भुईमूग निदसाठी नांदेडच्या आलेगाव येथे ट्रॅक्टर येत होता. अचानक हा ट्रॅक्टर पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळला. ट्रॅक्टर पडल्याने सात ते आठ महिलांचा मृत्यू झाला. प्रत्यक्ष पुरभाजी सरोदे यांनी दोन महिलांना बाहेर काढलं आहे. मात्र त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा विहिरीत बडून मृत्यू झाला आहे.

मी दोन महिलांना वाचवलं. मात्र माझी पत्नी विहिरीत आहे. सकाळी मी गावाकडून आलो होतो. मी समोर आलो होतो, ट्रॅक्टर पाठीमागून आला. मी वर होतो. आरडाओरडा झाल्यानंतर मी विहिरीजवळ आलो. विहिरीमध्ये सगळे 11 लोक होते. विहिरीमध्ये सगळ्या सात महिला आहेत, त्यात माझी पत्नी सुद्धा आहे. माझी पत्नी मला दिसली नाही. ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्या खाली गेल्या. दगडू शिंदे यांच्या शेतात कामाला आलो होतो. हे ट्रॅक्टर मालकाचं होतं. ड्रायव्हर मी येण्याअगोदर पळून गेला, असे पुरभाजी सरोदे म्हणाले.

तर संतोष कांबळे यांच्याही पत्नीचा मृत्यू झाला आहे. माझी अठरा वर्षाची मुलगी होती, तिचं लग्न करायच होतं. माझ्या बायकोला यांनी विहिरीतून काढलं. बायकोचा डोकं फुटलं, असे संतोष कांबळे यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं? 

नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर या ठिकाणी धक्कादायक घटना घडली. सकाळी 7 च्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजूर यांना हळद काढणीसाठी एक ट्रॅक्टरवरुन जात होतं. मात्र त्या ट्रॅक्टर चालकाला विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळला. या विहिरीत पाणी असल्याने अनेक महिला यात बुडाल्या. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.