AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र हादरला! 40 कोवळी मुलं, युवकांवर लैंगिक अत्याचार, 200 व्हिडीओ क्लिपमुळे मोठी खळबळ

मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयिताने अश्लील व्हिडिओ तयार करून त्याच्या आधारे पीडितांना ब्लॅकमेल करत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. २०२२ ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र हादरला! 40 कोवळी मुलं, युवकांवर लैंगिक अत्याचार, 200 व्हिडीओ क्लिपमुळे मोठी खळबळ
nandurbar child abuseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2026 | 5:43 PM
Share

Nandyrbar News : नंदुरबार शहरात बालक आणि युवकांवर कथित लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी चेतन कोळी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयिताने अश्लील व्हिडिओ तयार करून त्याच्या आधारे पीडितांना ब्लॅकमेल करत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

बालक आणि युवकांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार २०२२ ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात आला आहे. संशयित बालक आणि युवकांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्यानुसार शहरातील भोणे फाटा परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी किती बालक व युवक पीडित आहेत, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिली आहे.

आरोपी मुलांना जाळ्यात नेमकं कसं फसवायचा?

नंदुरबार शहरातल्या रायसिंगपुरा भागातील आरोपी काही मुलांना पैशांच्याआषिषानं जवळ करायचा. नंतर त्यांच्यावर अत्याचार करत. याबाबत आलेल्या तक्रारीनुसार ६ ऑगस्ट रोजी आरोपीनं एका अल्पवयीन मुलाला पपईच्या शेतात भेटण्यासाठी बोलावलं होतं. मात्र त्याआधीच त्या भागात साध्या वेशात पोलीस नजर ठेवून होते. आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला अटक केली.

लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं

आरोपीच्या मोबाईलमधल्या व्हिडिओंची पडताळणी करून पोलिसांनी पीडितांची ओळख पटवण्याचं काम सुरु केलं आहे. आरोपीजवळ असलेल्या मोबाईल, लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. जप्त साहित्याच्या तपासणीनंतर व्हिडीओ आणि फोटोची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांची छाननी सुरु आहे.

दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पालकांनी आपापल्या मुलांची काळजी घ्यावी. मुलांशी नेहमी संवाद ठेवावा, अशी मागणी केली जात आह.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?