अजितदादांचे पुतळे जाळा… असा फोन कुणी केला होता? नरेश म्हस्के यांचा सलग दुसरा गौप्यस्फोट

नरेश म्हस्के यांनी एकानंतर एक दोन गौप्यस्फोट करून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह उघडे पाडण्याचा प्रयत्न केलाय.

अजितदादांचे पुतळे जाळा... असा फोन कुणी केला होता? नरेश म्हस्के यांचा सलग दुसरा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 1:07 PM

ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थित शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे (Thane) माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी सलग दुसऱ्या दिवशी गौप्यस्फोट केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघडे पाडण्याचे प्रयत्न केले आहेत. काल अजित पवारांवर आरोप केल्यानंतर ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नरेश म्हस्के यांनी आरोप केले आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी झाला, त्यावेळी अजित पवारांविरोधात आंदोलन करा, त्यांचे पुतळे जाळा, असे फोन जितेंद्र आव्हाड यांनी कुणा कुणाला केले होते, हे एकदा तपासून घ्या.. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे पहायचे वाकून हा प्रकार असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली.

अजितदादा डोळे का मारतात?

अजितदादांचा खरा चेहरा आता लोक ओळखू लागलेत. जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतात तेव्हा मुंबईत अजितदादांचे बॅनर्स लागतात. याचाच अर्थ पक्षात मतभेद आहेत, असा आरोप नरेश म्हस्के यांनी केलाय. सकाळचा शपथ विधी केला जातो, रोहित पवार विरोधात काय ते काय करतात, उद्धव ठाकरे यांना अजित दादा का डोळे मारतात? अजित दादा जे काही करतात हे आता जनतेला कळाले आहे, असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलंय.

…तेव्हा आव्हाडांनी कुणा-कुणाला फोन केले?

अजित दादांनी पहाटेची शपथ केली त्यानंतर याच ठाण्यात आव्हाडांनी दादांचे पुतळे जाळायचे, फोटोला काळे फासायचे, असे फोन कोणा कोणाला केले, असा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केलाय. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कुणा-कुणाला फोन केले हे अजित दादांनी तपासून घ्यावे… स्वतःचे ठेवायचे झाकून दुसऱ्यांचे पहायचे वाकून अशी अजित दादांची गत झाल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केलाय. .. भाजपा युती म्हणून निवडून आलो आणि मविआत शामिल झाले मग कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसले हे कळेल… आव्हाडांनी जुने ट्विट काढून पहावे. त्यांनी त्यांच्याच आठवणींच्या पाठीत खंजीर खुपसले हे त्यांना कळेल, अशी टिप्पणी नरेश म्हस्के यांनी केली.

पहिला गौप्यस्फोट काय?

नरेश म्हस्के यांनी ठाण्यात बोलताना यापूर्वीही एक दावा केलाय. रोहित पवार यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केले होते, असा आरोप त्यांनी केलाय. राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह या निमित्ताने नव्याने चर्चेत आले आहेत.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.