AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narsapur Horror : नरसापूर प्रकरणातील आरोपीचं महाभयंकर कृत्य, सरकारी वकिलांनी सांगितली एक एक गोष्ट; म्हणाले, युक्तिवाद नाही, डायरेक्ट…

नरसापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाने दोषी ठरवले आहे. सोमवारी शिक्षेची सुनावणी होणार असून, सरकारी वकिलांनी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आरोपीने आधीही दोन गुन्हे केले असल्याने, जन्मठेप दिल्यास तो पुन्हा असेच कृत्य करेल अशी भीती व्यक्त केली. ८२ साक्षीदार, डीएनए पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे त्याचे क्रूर कृत्य सिद्ध झाले आहे.

Narsapur Horror : नरसापूर प्रकरणातील आरोपीचं महाभयंकर कृत्य, सरकारी वकिलांनी सांगितली एक एक गोष्ट; म्हणाले, युक्तिवाद नाही, डायरेक्ट...
| Updated on: Jun 25, 2026 | 2:47 PM
Share

नरसापूर प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्याला येत्या सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. तुला कोणती शिक्षा देऊ? असा सवाल कोर्टाने आरोपीला केला. गुन्हा अत्यंत गंभीर असल्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलाने केली आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय देतं हे चार दिवसानंतर समजणार आहे. कोर्टाने अत्यंत जलदगतीने हे प्रकरण हाताळलं आहे. कोर्टाने आरोपीला दोषी ठरवल्यानंतर सरकारी वकिलांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या घटनेची एक एक माहिती दिली.

या विकृताला जगण्याचा अधिकार नाही. तो आधी दोन गुन्ह्यात होता. तांत्रिक कारणामुळे तो सुटला. त्यामुळे त्याला जन्मठेप दिली तर तो तेच कृत्य करेल. म्हणून त्याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही कोर्टाला केली आहे. मृत्यूदंड देताना घाई गर्दीत देता येत नाही. तसे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. केस लॉ आहेत. त्याचा अभ्यास करून या प्रकरणावर कोर्ट निर्णय देईल, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

82 साक्षीदार…

या प्रकरणात एकूण 82 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तर, 16 दिवसात 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. आरोपीने पीडितेचे 39 मिनिटे शोषण केलं होतं. पीडितेच्या अंगावर 18 जखमा होत्या. आरोपी आणि मयताचा डीएनए मिळाला होता. मुलीच्या तोंडात कोंबलेल्या बोळ्यात आरोपीची लाळ सापडली. अंगावर रक्त सापडलं. या प्रकरणआत प्रत्यक्ष साक्षीदार कोणी नव्हता. पण या आरोपीसोबत मुलीला अखेरचं पाहण्यात आलेलं आहे. नरसापूरमधील 6 सीसीटीव्हीचं डिटेल विश्लेषण करण्यात आलं आहे. त्यावरून आरोपीनेच हे कृत्य केल्याचं सिद्ध झालं आहे, असं वकिलाने सांगितलं.

युक्तिवाद होणार नाही…

आरोपी लैंगिक कृत्यासाठी सक्षम आहे की नाही त्याचे रिपोर्ट घेण्यात आले. इतर रिपोर्ट आले आहेत. आरोपीला कायद्याची भीती नव्हती. पोलिसांसमोर मोठं चॅलेंज होतं. एसआयटीने अहोरात्र काम केलं. कोर्टाला तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी तारीख ठेवली आहे. कोर्टात सोमवारी युक्तिवाद होणार नाही, थेट निर्णय येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सेम केस

बच्ची सिंग आणि बच्चन संग प्रकरणात आणि या प्रकरणात साम्य आहे. थंड डोक्याने गुन्हा झाला आहे. मुलगी हेल्पलेस होती. त्याने मुलीची रेकी केली. आजीसोबत मुलगी राहते. आजीसोबत राहत असल्याने त्याने तिला टार्गेट केलं. घटनेच्या दिवशी मुलांना दगड मारून शिवीगाळ करून हाकलून दिलं. त्यानंतर तो मुलीला घेऊन गेला. त्यानंतर मुलं परत आले, तेव्हा त्याने मुलांना परत दगड मारले. त्यामुळे त्याला फाशी दिली पाहिजे, ही मागणी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?