AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकची सीटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल 200 फेऱ्या रद्द, महापौरांनी कारणही सांगितलं

नाशिकमधील सिटी लिंक बससेवा कोलमडली आहे. वाहतूक कोंडीमुळे ही बससेवेच्या 200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

नाशिकची सीटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल 200 फेऱ्या रद्द, महापौरांनी कारणही सांगितलं
| Updated on: Aug 14, 2026 | 12:23 PM
Share

नाशिककरांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. नाशिक शहरातील सिटी लिंक बससेवा कोलमडली आहे. नाशिक प्रशासनाने तब्बल 200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत . शहरातील 200 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याने सर्वसामान्यांसह प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत. शहरात वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण प्रशासनाने निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या माध्यामातून शहरात सिटीलिंक बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा ग्रामीण भागातील नागरिकांनाही फायदेशीर ठरत आहे. शहरातील शेकडो नागरिक या सेवेचा लाभ घेताना दिसत होती. ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थी या बससेवेने येजा करत होते. ही सिटीलिंक बससेवा शहरातील कॉलेज, शाळा, उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत होती. परंतु प्रशासनाने अचानक 200 बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकमध्ये (Nashik ) वाहतूक कोंडी होत असल्याने प्रशासनाने निर्णय घेत असल्याचे सांगितले आहे. शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचा नागरिकांचा आरोप होत आहे. त्यात प्रवासी संख्या कमी असलेल्या भागात रिकाम्या चालणाऱ्या 200 गाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबताची माहिती महापौर हिमगौरी आडके यांनी दिली.

नाशिकमध्ये खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी

नाशिकमध्ये अपघातात (Accident) जखमी झालेल्या दिलीप काळे यांचा 24 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 20 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर मार्गावर काळे यांना दुचाकी वाहनाने धडक दिली होती. अपघातात दिलीप काळे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. अपघात हा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झाल्याचा अपघातात मृत्यूमुखी पडल्याचा आरोप दिलीप काळे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. स्थानिक नगरसेवकांनीही सदर व्यक्तीचा मृत्यू हा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात झाल्याने झाल्याचा दावा केला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या रस्ते अपघात समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून सदरचा अपघात खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झाला आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?